शासनआपल्यादारी कार्यक्रमासाठी आता मधपाची दिशा आणि जागा थोडी बदलली आतातरी कार्यक्रम निर्विघ्न होणार का ?
शासनआपल्यादारी कार्यक्रमासाठी आता मधपाची दिशा आणि जागा थोडी बदलली आतातरी कार्यक्रम निर्विघ्न होणार का ? जेजुरी दि ५ पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हा कार्यक्रम सलग चार वेळा पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर आता सोमवारी म्हणजे दिनांक सात ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम जेजुरी ते पुन्हा होणार आहे. मात्र हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमाचे ठिकाण मात्र बदलण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यात जेजुरी येथे शासन आपल्यादारी हा कार्यक्रम घेण्याचे राज्य सरकारने ठरवलं होतं. संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम होणार होता. अनेक लाभार्थींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ दिला जाणार होता. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जेजुरी येथील नवीन पालखीतळाची निवड केली होती. मोठी जागा असल्यामुळे या ठिकाणी दोन लाख लोक बसतील असा अंदाज करून या ठिकाणी मंडप टाकण्यात आला होता. स्टेज सजवण्यात आले होते. मात्र सलग चार वेळा या ठिकाणी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या ठिकाणचा मांडव ही काढण्यात आला...