शिंदे-फडणवीस सरकारकडून तातडीची मदत, अजित पवारांना मुंबईत येण्यासाठी सरकारी विमान

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे तातडीने नागपुरातून ( Nagpur ) मुंबईला ( Mumbai ) येणार असल्याची माहिती मिळत आहे. पण शिंदे फडणवीस सरकारने अजित पवार यांच्या तातडीच्या प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन दिल्याची माहिती समोर आली आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मुंबईत येण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात ( Nagpur winter session) आहेत. तरच विरोधी पक्षनेत्याला सरकारी विमानाची परवानगी अजित पवार दुपारी एक वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहे. यासाठी शिंदे सरकारकडून विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेत्याला अशाप्रकारच्या सोयी उपलब्ध असतात परंतु त्यासाठी त्यांना कारण नमूद करावं लागतं. त्या कारणाची पडताळणी केल्यानंतरच विमानाची परवानगी देण्यात येते. आजच्या दिवसातील आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यामुळे अजित पवार त्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आ...