पोस्ट्स

गुजरात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधानांसह दिग्गजांची उपस्थिती

इमेज
    गुजरात विधानसभेची   निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपनं 156 जागा जिंकत दणदणित विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली आहे. भूपेंद्र पटेल हे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा आज , 12 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शाह , भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. सोबतच भाजपचे अन्य राज्यांतील काही मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत   ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या बैठकीत भाजप आमदार कनू देसाई यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता ज्याला उपस्थित आमदारांनी एकमताने मंजुरी दिली. निकाल हाती आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेत भाजप विधीमंडळ गटाची बैठक बोलावण्यात आली ...