आज राजकीय भूकंप? शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर

इं दापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे राज्याच्या व देशाच्या राजकारणात सातत्याने लक्ष असते ; मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यावर विशेष लक्ष शरद पवारांची नेहमीच असते 2023 या नववर्षात शनिवारी (दि. 31) जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात , शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी व शेतीतील विविध प्रयोग पाहण्यासाठी , शरद पवार उपस्थित राहणार असल्याने , शरद पवार यांची एन्ट्री नव्या वर्षात राजकीय वेगळा भूकंप घडवणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस विकासकामातून अत्यंत मजबूत केलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती पाठोपाठ इंदापूर तालुका हा पवारांच्या पाठीशी नेहमीच खंबीर उभा असतो ; मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने , इंदापूर तालुका व बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट करून अनेक चकरा वाढवलेल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पावरफुल मानले जाणारे ...