Saturday, December 31, 2022

आज राजकीय भूकंप? शरद पवार इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यावर

 


इंदापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे राज्याच्या व देशाच्या राजकारणात सातत्याने लक्ष असते; मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्‍यावर विशेष लक्ष शरद पवारांची नेहमीच असते 2023 या नववर्षात शनिवारी (दि.

31) जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी व शेतीतील विविध प्रयोग पाहण्यासाठी, शरद पवार उपस्थित राहणार असल्याने, शरद पवार यांची एन्ट्री नव्या वर्षात राजकीय वेगळा भूकंप घडवणार का? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस विकासकामातून अत्यंत मजबूत केलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती पाठोपाठ इंदापूर तालुका हा पवारांच्या पाठीशी नेहमीच खंबीर उभा असतो; मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने, इंदापूर तालुका व बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट करून अनेक चकरा वाढवलेल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पावरफुल मानले जाणारे इंदापूर तालुक्‍यातील एकमेव गाव बोरी ग्रामपंचायत असून या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता मागील काही दिवसात पुन्हा ग्रामपंचायतीवर निर्विवाद आणि मात्र विरोधकांनी हे गाव आमचे विचाराचे होत आहे. अशा वल्गना केल्या बोरी गावची नाळ पवार घराण्याची एकनिष्ठ राहिल्याने खास शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी वेळ दिल्याची समजते.

प्रवेश सोहळा रंगणार?
इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यांसाठी विरोधी पक्षात काम करणारे अनेक दिग्गज उत्सुक आहेत. शरद पवारांचा दौरा नव्या वर्षात पहिल्याच दिवशी इंदापूर तालुक्‍यात होत असल्याने नव्या वर्षात राजकीय भूकंप होण्याची गणिते परिपक्‍व राष्ट्रवादी कॉंग्रेस करेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्‍त करत आहेत.

उसाचा प्रश्‍न मार्गी लावल्याने शेतकरी खूश
मागील काही महिन्यापूर्वी इंदापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे शेतात उभे असणाऱ्या, परिपक्‍व उसाच्या गाळपा संदर्भात, नियोजनासाठी आग्रह धरला होता. याच आग्रहा खातार राष्ट्रवादी कॉंग्रेसने, शेतकऱ्यांच्या उसाचे नियोजन करून ऊस तोडी व्यवस्थित चालवले आहेत त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर खुश झाला आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured Post

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला पुणे युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन;...