जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे यांनी केली कामाला सुरुवात. प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत दिल्या सुचेना

जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे यांनी केली कामाला सुरुवात. प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत दिल्या सुचेना





निरा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राजक्ता दुर्गाडे यांची सदिच्छा भेट; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा गौरव



पुरंदर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देणाऱ्या निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पुणे जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे यांनी सदिच्छा भेट देत तेथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. रुग्णसेवेसाठी केलेल्या अखंड परिश्रमांची दखल घेत त्यांच्या समस्या जाणून घेत जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. 


       निरा येथील आयुष्यमान आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागासाठी आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. आपत्कालीन सेवा, लसीकरण मोहिमा, माता-बाल संगोपन, तसेच विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र समाजाच्या आरोग्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहे. या सर्व उपक्रमांची माहिती घेत दुर्गाडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 


       यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाचे कौतुक केले. ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेमार्फत कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य सेवकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


        समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्व आरोग्यसेवकांना मनापासून सलाम व्यक्त करत दुर्गाडे यांनी त्यांच्या कार्यास नेहमीच पाठबळ देण्याचा विश्वास दिला. 


     या प्रसंगी पुरंदर पंचायत समिती सदस्या मोनिका कांबळे, निरेचे माजी सदस्य ॲड. पृथ्वीराज चव्हाण, अनिल चव्हाण, स्वप्निल कांबळे, निरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे बापूसाहेब भंडलकर, बेबी तांबे यांसह आरोग्य सेवक व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.