पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन, पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार ( BJP MLA ) लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळीच ही दुःखद घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील ( Pune ) खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण , दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली , अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. देवेंद्र फडणवीसांनी मानले होते आभार जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या या मतदानाच्या वेळी पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यादेखील कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. मुक्ता टिळख आणि लक...