तालुक्यातील या गावात जमावाकडून एकाला कोयत्याने मारहाण भांडण सोडवण्यास गेलेल्या चुलत भाव व वडिलांवरही कोयत्याचे वार

 

 पिंपरी येथे जमावाकडून एकाला कोयत्याने मारहाण भांडण सोडवण्यास  गेलेल्या  चुलत भाव व वडिलांवरही  कोयत्याचे वार



 

      पुरंदर तालुक्यातील  पिंपरी येथे जमावाकडून  एकाला कोयत्याने मारहाण करण्यात आलीय. त्याच बरोबर भांडण सोडवण्यास  गेलेल्या  चुलत भाव व वडिलांवरही  कोयत्याचे वार करण्यात आले आहेत .याबाबत पोलिसानी भारतीय दंड विधान कलम 307,324,323,504,506,427,143,147,148,149 आर्म ऍक्ट 4,25 नुसार गुन्हा दाखल  केला आहे.

   याबाबत जेजुरी पोलिसानी दिलेली माहिती असी की, पिंपरी येथे राहणारे १७ वर्षीय अनिकेत दत्तात्रय शेंडकर यांनी याबाबत जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादी नुसार  16/02/2022 रोजी  साडे बारा वाजलेच्या सुमारास फिर्यादी यांचे घरासमोर आरोपी अनिकेत रविँद्र शेंडकर, सागर दत्तात्रय शेंडकर आणि अन्य अनोळखी पाच व्यक्ती यांनी बेकायदा गर्दी जमवून तू मला  शिवीगाळ का केली ? असे म्हणून धारदार कोयत्याने व  लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांना मारहाण व  शिवीगाळ  करून जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड व कोयत्याने फिर्यादी यांचे चेहऱ्यावर मारून गंभीर दुखापत केली.  त्यांना सोडवण्यासाठी त्यांचे वडील मध्ये आले असता त्यांना देखील मारहाण करून त्यांचे पाठणीत कोयत्याने वार केला. तसेच फिर्यादी याचे  चुलत भाऊ हे मध्ये  सोडवण्यासाठी आले असता त्याचे देखील पाठणीत कोयता  मारून गंभीर दुखापत केली आहे. अश्या प्रकारची फिर्याद शेंडकर  दिली असून याबाबतचा अधिकच तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवलकर करीत आहेत.

 

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.