पोस्ट्स

खा.सुप्रिया सुळे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी

इमेज
 पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी  सर्व्हे करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र भोर : दि.१८          बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार कडे केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी...

वीर येथे महिलांसाठी बँक साक्षरता अभियान संपन्न

इमेज
 वीर येथे महिलांसाठी बँक साक्षरता अभियान संपन्न वीर दि.८         पुणे जिल्हा बँक आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या त्यांच्यावतीने पुरंदर तालुक्यातील वीर येथे आज (दि.८) जुलै रोजी महिलांसाठी बँक साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाला सुरुवात करण्यात आली.           महिलांना बँकेबाबतची माहिती व्हावी बँकेचा कारभार कशा पद्धतीने चालवला जातो? बँकेत आल्यावर बँकेत खाते कसे काढावे? बँकेचे व्यवहार कशा पद्धतीने करावेत? बँकेमध्ये स्लिप कशी भरावी? याबाबतची महिलांना माहिती देण्यात आली. महिला बँकिंग साक्षर व्हाव्यात म्हणून हे साक्षरता अभियान खा.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनंतर राबविण्यात येत आहे. आज पुरंदर तालुक्यातील वीर येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वेळ परिसरातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आ.संजय जगताप व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी मार्ग दर्शन क...