वीर येथे महिलांसाठी बँक साक्षरता अभियान संपन्न

 वीर येथे महिलांसाठी बँक साक्षरता अभियान संपन्न




वीर दि.८


        पुणे जिल्हा बँक आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या त्यांच्यावतीने पुरंदर तालुक्यातील वीर येथे आज (दि.८) जुलै रोजी महिलांसाठी बँक साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाला सुरुवात करण्यात आली. 



         महिलांना बँकेबाबतची माहिती व्हावी बँकेचा कारभार कशा पद्धतीने चालवला जातो? बँकेत आल्यावर बँकेत खाते कसे काढावे? बँकेचे व्यवहार कशा पद्धतीने करावेत? बँकेमध्ये स्लिप कशी भरावी? याबाबतची महिलांना माहिती देण्यात आली. महिला बँकिंग साक्षर व्हाव्यात म्हणून हे साक्षरता अभियान खा.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनंतर राबविण्यात येत आहे. आज पुरंदर तालुक्यातील वीर येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वेळ परिसरातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आ.संजय जगताप व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी मार्ग दर्शन केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.