Posts

Showing posts with the label न्यायालयीन

नोटरी वर केलेल्या साठेखतावरुन खरेदीखत करुन देण्याचे न्यायालयाचे आदेश

Image
 नोटरी वर केलेल्या साठेखतावरुन खरेदीखत करुन देण्याचे न्यायालयाचे आदेश ... ( नोटरी दस्ताबाबत नागरीकांचा  गैरसमज दुर करणारा निकाल ) सोमेश्वरनगर...(प्रतिनिधी )   नोटरी दस्ताबाबत अद्याप नागरिकामधे विशेषत: ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. नोटरी दस्त सहा महिने चालतो ,त्याला कायदेशीर मान्यता नसते त्यांचे पुढील प्रतिज्ञापत्रापेक्षा तहसिलदार यांचेकडे केलेले प्रतिज्ञापत्राला महत्व असते वै  गैरसमजातून अनेक नागरिक आपल्या रकमांची अथवा कराराची नोंद करण्याचे टाळतात व पुढे आर्थीक नुकसानाला सामोरे जातात.बरेचदा गुंठेवारी कायदा  अथवा तत्सम तांत्रीक बाबीमुळे नोंदणीकृत दस्ताला अडचणी येतात अशा वेळी या  तांत्रीक अडचणी दुर  होईपर्यंत आपल्या रकमा अथवा करार सुरक्षीत करण्यासाठी भारत सरकार द्वारे अथवा राज्य शासनाद्वारे नेमलेल्या नोटरी अधिकारी समोर जर अधिकृत नोंदवुन नोटरी  दस्त केला तर त्याचा फायदा होवु शकतो हे दर्शवणारा निकाल नुकताच बारामती न्यायालयाने दिला आहे .     बारामती तालुक्यातील विजय कृष्णराव जगताप यानी  नोटरी द्वारे  २००५ साली साठेखत करुन एक घर खर...