Posts

Showing posts with the label cmdrkant patil

पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले : एस. एम. देशमुख यांची माहिती

Image
 पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले : एस. एम. देशमुख यांची माहिती  पुणे  :   मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर निदर्शने झाली. पिंपरी चिंचवड येथेली दलित संघटनांनी पाटलांवर शाईफेक केली. याचे वार्तांकन व व्हिडीओ शुटींग करणाऱ्या पत्रकार गोविंद वाकडे यांना रविवारी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. याबाबत विविध पत्रकार संघटनांसह मराठी पत्रकार परिषदेने निषेध व्यक्त करत आंदोलनाची भुमिका घेतल्याने रात्री उशिरा पत्रकार वाकडे यांना सोडण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.       पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर शाईफेक करणाऱ्यांना अटक झाली, तर तब्बल ११ पोलीस निलंबित करण्याया हलचाली सुरू आहेत. त्याच बरोबर या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार गोविंद वाकडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा सरळ सरळ पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता. याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र भर उमटली. मराठी पत्रकार परिषदेने या विषयाच्या अनुषंगाने तात...