Type Here to Get Search Results !

पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले : एस. एम. देशमुख यांची माहिती

 पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले : एस. एम. देशमुख यांची माहिती पुणे  :

  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर निदर्शने झाली. पिंपरी चिंचवड येथेली दलित संघटनांनी पाटलांवर शाईफेक केली. याचे वार्तांकन व व्हिडीओ शुटींग करणाऱ्या पत्रकार गोविंद वाकडे यांना रविवारी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. याबाबत विविध पत्रकार संघटनांसह मराठी पत्रकार परिषदेने निषेध व्यक्त करत आंदोलनाची भुमिका घेतल्याने रात्री उशिरा पत्रकार वाकडे यांना सोडण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली. 


     पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर शाईफेक करणाऱ्यांना अटक झाली, तर तब्बल ११ पोलीस निलंबित करण्याया हलचाली सुरू आहेत. त्याच बरोबर या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार गोविंद वाकडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा सरळ सरळ पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता. याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र भर उमटली. मराठी पत्रकार परिषदेने या विषयाच्या अनुषंगाने तातडीची बैठक घेऊन उद्या सोमवारी राज्यभर आंदोलन करण्याचे ठरविले होते. विविध पत्रकार संघटनांच्या ऑनलाईन बैठकीत अटकेचा निषेध करून उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र ती वेळ आली नाही. 


     पत्रकार संघटनांचा आक्रमक पवित्रा आणि पत्रकाराच्या संतप्त भावना विचारात घेऊन सरकारने माघार घेत गोविंद वाकडे यांची रात्री उशीरा अकराच्या सुमारास सुटका करावी लागली. पत्रकार एकत्र आले तर काय होऊ शकते हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 


       पत्रकार संघटना आणि राज्यातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबददल मराठी पत्रकार परिषदेच्या मुख्य विश्वस्त एस. एम, देशमुख, किरण नाईक, राज्य अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनिल वडगुळे, पुणे जिल्हा सोशल मिडिया परिषदेचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवड सोशल मिडिया परिषदेचे अध्यक्ष सुरज साळवे, प्रविण शिर्के, बाळासाहेब ढसाळ, नाना कांबळे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी राज्यातील सर्व पत्रकार संघटनाचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies