पुरंदर तालुका काँग्रेसकडून गॅस दरवाढ व फसव्या कर्जमाफीविरोधात आंदोलनाचा इशारा तालुक्यातील सासवड, पिसर्वे, वाल्हे, परिंचे, वीर, निरा या गावांत होणार निदर्शने.

पुरंदर तालुका काँग्रेसकडून गॅस दरवाढ व फसव्या कर्जमाफीविरोधात आंदोलनाचा इशारा 

तालुक्यातील सासवड, पिसर्वे, वाल्हे, परिंचे, वीर, निरा या गावांत होणार निदर्शने.



पुरंदर :

       गॅसच्या किमतीत झालेली भरमसाठ दरवाढ, गॅस वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी दिली आहे. 


        पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने युवा नेते दत्ता झुरुंगे, सुनील असवलीकर व प्रा. सचिन दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध ठिकाणी निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गॅस व शेती खतांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच राज्य शासनाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

याविरोधात शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येणार असून नागरिक, महिला, युवक तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


      या आंदोलनांतर्गत शनिवार (दि. १४ मार्च) रोजी सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत पिसर्वे बाजारतळ येथे आंदोलन होणार आहे. सोमवार (दि. १६ मार्च) रोजी सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत सासवड येथील शिवतीर्थ चौक ते महात्मा ज्योतिबा फुले स्मारक बाजारतळ येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवार (दि. १७ मार्च) रोजी वाल्हे येथे भैरवनाथ मंदिर ते महात्मा गांधी स्मारक चौक असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 


     तसेच बुधवार (दि. १८ मार्च) रोजी परिंचे बाजारतळ चौक येथे दुपारी १२.३० ते २ या वेळेत, वीर श्रीनाथ मंदिरासमोर दुपारी ३ ते ५ या वेळेत आणि निरा ग्रामपंचायत समोरील चौकात सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत आंदोलन होणार आहे. 


        केंद्र व राज्य सरकारने गॅस दरवाढ कमी करावी, गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी करून ७/१२ कोरा करावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

        या आंदोलनास काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई