'मी XX नाही, शिवसेना XXX ची अवलाद नाही', संजय राऊत पुन्हा नको ते बोलले, मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले

मुंबई , 24 नोव्हेंबर : एक कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा मुख्यमंत्री उद्योग पळवून नेतो. षंढा सारखे बसला तुम्ही. मी सीमा भागात गेलो आहे , आताही परत जाईल. मी XX नाही , शिवसेना XXX ची अवलाद नाही. मी परत सांगतो. मुख्यमंत्र्यांकडे सीमाभागाचा भार होता तर 10 वर्षामध्ये का गेला नाही ? असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचे , सरकार मिंधे असेल , पण आजही शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावू. रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू. 106 हुतात्म दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे , आम्हीही भोगो. शिवसेनेकडून धमकी देतोय , महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा , हा इशारा नाही धमकी देतोय , असंह...