Posts

Showing posts with the label सरकार

एचएमपीव्ही विषाणूची महाराष्ट्र मध्ये एन्ट्री

Image
 एचएमपीव्ही विषाणूची महाराष्ट्र मध्ये एन्ट्री  नागपूर मध्ये आढळले दोन रुग्ण  मुंबई. दि.७           एचएमपीव्ही या विष्णूची महाराष्ट्रात देखील एंट्री झालेली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या विष्णूने बाधित झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता एचएमटीव्ही विष्णूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांमध्ये एक सात वर्षाचा तर दुसरा तेरा वर्षाचा रुग्ण आहे. देशामध्ये बंगलोर, नागपूर आणि तामिळनाडू त्याचबरोबर अहमदाबाद या शहरांमध्ये एचएमटीव्ही या वायरचे रुग्ण आढळले आहेत आणि त्यानंतर आता टास्क फोर्सची घोषणा करण्यात आलेली आहे. पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या मुख्याधिकारी असणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा आरोग्य विभाग या रुग्णांवर सध्या लक्ष ठेवून आहे. यानंतर आता एचएमटीव्ही व्हायरसने महाराष्ट्रात प्रवेश केल्याचं निश्चित झालेल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लोकांना देखील या व्हायरसने बाधा होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक होणार आहे. चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोम...

कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या

Image
 कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या निश्चित दि.18 कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे.  सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री?  सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला. सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपद...

विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात : राजेंद्रकुमार सराफ

Image
विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात.: राजेंद्रकुमार सराफ सोमेश्वरनगर: ७ मे  आजच्या समाजात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी  शालेय विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करु शकतात. शालेय जीवनातच मुलांमध्ये पर्यावरण विषयक सजगता निर्माण झाल्यास  हीच मुले मोठी झाल्यावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करतील असा विश्वास पर्यावरण अभ्यासक रो. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संवर्धन कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रो. प्रा. डॉ अजय दरेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीच्या डायरेक्टर रो. गौरी शिकारपुर, विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक सचिन पाठक, रो. दर्शना गुजर, रो. अरविंद गरगटे, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड चे अध्यक्ष रो. प्रकाश सुतार, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रोट्रॅक्टर आदित्य भावसार, रोट्रॅक्टर आशिष आदी मान्यवर उपस्थित होते. आपले म्हणजे मानवाचे भ...

माजी मंत्री विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या तज्ञ सदस्यपदी निवड

Image
 माजी मंत्री विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या तज्ञ सदस्यपदी निवड पुरंदर दि. १८    पुरंदर_हवेलीचे माजी आमदार ,माजी मंत्री,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे...तज्ञ सदस्य म्हनून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.     शिवतारे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत.पुणे जिल्ह्यात त्यांनी राष्ट्रवादी विरोधात आक्रमक आघाडी घेतली आहे . पूर्वी पासूनच ते शरद पवार, अजित पवार,आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार टीका करतात.शिवतारे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मतदार संघात बांधनिही सुरू केली आहे .बारामती, इंदापूर, भोर अशा तालुक्यातून दौरे करून जनसंपर्क वाढवत राष्ट्रवादीच्या गोटात फोडा फोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवतारे हे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवणीस यांचे जवळचे मानले जातात.. शिवसेनेत जरी असले तरी देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवड...