पोस्ट्स

पुरंदर विमानतळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विमानतळ बाधितांच्या आंदोलनाला माजी मंत्री बच्चू कडू यांचा पाठिंबा : 20 तारखेला घेणार जाहीर सभा

इमेज
  विमानतळ बाधित शेतकऱ्यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच :  बच्चू कडू यांची विमानतळात उडी  सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध वाढताना दिसत असतानाच आता माजी आमदार बच्चू कडू यांनी विमानतळातील बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असून 20 एप्रिल रोजी पुरंदर मध्ये जाहीर सभा घेणार आहेत.        विमानतळ बाधित असणाऱ्या शिष्टमंडळाने माजी आमदार बच्चू कडू यांचे भेट घेऊन सरकार शेतकऱ्यांवर कशा पद्धतीने अन्याय करीत आहे हे स्पष्ट केले शिष्टमंडळाने केलेल्या चर्चा नंतर बच्चू कडू यांनी बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू असे अस्वस्थ केले. 20 एप्रिल रोजी जाहीर सभा घेऊन असेही सांगितले           यावेळी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, नामदेव कुंभारकर, किरण होले, सुनील कुंभारकर सुरेखा ढवळे, अमोल बोरावके, सुजित बोरावके, अमोल बनकर उपस्थित होते.        पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधत बाधीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषणा मध्ये पुरंदर तालुक्यातील प...

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी

इमेज
 पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी  सर्व्हे करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र भोर : दि.१८          बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार कडे केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी...