Posts

Showing posts with the label मुहूर्त ठरला! २०२४च्या संक्रांतीनंतर रामलल्ला विराजमान;.

मुहूर्त ठरला! २०२४च्या संक्रांतीनंतर रामलल्ला विराजमान; 'असं' असणार राम मंदिर

Image
  अ योध्या : बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील. त्यानंतर सर्वांना त्यांचे दर्शन घेता येईल , अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्र यांनी ' लोकमत ' ला दिली. मंदिराच्या पहिल्या मजल्याची उभारणी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे , असेही त्यांनी सांगितले. डॉ. मिश्र यांनी सांगितले की , पहिल्या मजल्यावर १० , ६५४ दगडांचा वापर केला आहे. आणखी ३ , ००० दगड वापरले जाणार आहेत. गर्भगृहाचे मार्बल पिलर लावणे सुरू झाले आहे. तीन बाजूंनी ३० मीटर अंतरावर रिटेनिंग वॉलची उभारणी वेगाने सुरू आहे. परिसरात १६१ फूट विजयपताका लावण्यात येणार आहे. वादळ-वाऱ्यातही ही पताका उभी राहावी , अशी व्यवस्था आहे. प्रवेशासाठी २ मार्ग डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की , मंदिर परिसराभोवतीची चारीही बाजूंची भिंत १८ फूट उंचीची असेल व त्यावर मोठमोठे वॉच टॉवर असतील. लखनौच्या गव्हर्नर हाऊसमधल्याप्रमाणे या भिंती असतील. या भिंतींच्या बाहेर मानवी तपासणी करण्...