पोस्ट्स

40 कढया आमटी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

40 कढया आमटी, 65 क्विंटलच्या बाजरीच्या भाकरी

इमेज
  बे ल्हे - श्रीक्षेत्र आणे (ता.जुन्नर) येथे पौष शुद्ध प्रतिपदा व द्वितीय या तिथींना श्री रंगदास स्वामी महाराजांचा पुण्यस्थिती सोहळा उत्साहात पार पडला असून असून शनिवार (दि. 24) व रविवार (दि. 25) या दोन दिवसांत 1 लाख भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली होती. यासाठी आमटी बनवण्यासाठी सुमारे 8 लाख रुपयांचा मसाला व तूरडाळ लागली. अनुक्रमे पहिल्या 20 व दुसऱ्या दिवशी 20 अशा 40 कढ्या आमटी तयार करण्यात आली. आणि 65 क्विंटल बाजरीच्या भाकरी घरोघरी तयार करून अगदी वाजत-गाजत मिरवणुकीने देवस्थानच्या आवारात आणण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी दिली.या आमटी मसाल्यामध्ये हळद , मिरची , काळीमिरी , दालचिनी , लवंग , जायपत्री , मायपत्री , खसकस , जिरी , मोहरी या देशी मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जातो. या मसाल्याच्या जोडीला तूरडाळीचा वापर करून स्वादिष्ट अशी आमटी या दोन दिवसांत बनवण्यात आली. या दोन दिवशी आमटी भाकरी महाप्रसाद वितरणासाठी सरदार पटेल हायस्कूल , पोस्ट बेसिक आश्रमशाळा , समर्थ इंजिनिअरींग कॉलेज बेल्हे , मातोश्री प्रतिष्ठान , कर्जुले येथील विद्यार्थ्यांनी सेवा दिली. म...