बेल्हे - श्रीक्षेत्र आणे (ता.जुन्नर) येथे पौष शुद्ध प्रतिपदा व द्वितीय या तिथींना श्री रंगदास स्वामी महाराजांचा पुण्यस्थिती सोहळा उत्साहात पार पडला असून असून शनिवार (दि. 24) व रविवार (दि.
यासाठी आमटी
बनवण्यासाठी सुमारे 8 लाख
रुपयांचा मसाला व तूरडाळ लागली. अनुक्रमे पहिल्या 20 व दुसऱ्या दिवशी 20 अशा 40 कढ्या आमटी तयार करण्यात आली. आणि 65 क्विंटल बाजरीच्या भाकरी घरोघरी तयार करून अगदी वाजत-गाजत
मिरवणुकीने देवस्थानच्या आवारात आणण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष विनायक
आहेर यांनी दिली.या आमटी मसाल्यामध्ये हळद, मिरची,
काळीमिरी, दालचिनी, लवंग, जायपत्री, मायपत्री, खसकस, जिरी, मोहरी या देशी मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जातो. या
मसाल्याच्या जोडीला तूरडाळीचा वापर करून स्वादिष्ट अशी आमटी या दोन दिवसांत बनवण्यात
आली. या दोन दिवशी आमटी भाकरी महाप्रसाद वितरणासाठी सरदार पटेल हायस्कूल, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, समर्थ
इंजिनिअरींग कॉलेज बेल्हे, मातोश्री
प्रतिष्ठान, कर्जुले येथील विद्यार्थ्यांनी सेवा
दिली.
महाराष्ट्रातीलच
नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या आमटी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आले
होते. यात्रा कमिटीने गावातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून खिसेकापूंवर
नियंत्रण ठेवले असल्याची माहिती उपाध्यक्ष अनिल आहेर यांनी दिली. याप्रसंगी
जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनीस,आमदार अतुल
बेनके, आशाताई बुचके, पांडुरंग पवार, भेट देवून
सर्व भाविकांनी गर्दी न करता आमटी-भाकरी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले
होते.