महिला दिनानिमित्त निरा शहरातील महिला बचत गटांची ‘शिवथरघळ’कडे भक्तीमय सहल दासबोध वाचनाने रंगला आध्यात्मिक सोहळा; माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा उपक्रम.

महिला दिनानिमित्त निरा शहरातील महिला बचत गटांची ‘शिवथरघळ’कडे भक्तीमय सहल 


दासबोध वाचनाने रंगला आध्यात्मिक सोहळा; माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा उपक्रम. 



पुरंदर  :

        महिला दिनानिमित्त महिलांच्या कष्टमय आयुष्यात आनंदाचे आणि अध्यात्मिक समाधानाचे क्षण यावेत या उद्देशाने निरा शहरातील महिला बचत गटांच्या महिलांसाठी शिवथरघळ येथे मोफत धार्मिक सहलीचे आयोजन माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण यांच्याकडून करण्यात आले. सुमारे ४० महिलांनी या सहलीत सहभागी होत समर्थांच्या पवित्र स्थळी दर्शन घेत भक्तीभावाने दासबोधाचे वाचन केले. 


           ८ मार्च ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने निरा शहरातील महिला बचत गटातील महिलांसाठी शिवथरघळ येथे नुकतेच मोफत धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आयुष्यातील दैनंदिन जबाबदाऱ्या आणि कष्टांमधून थोडा विरंगुळा मिळावा तसेच अध्यात्मिक समाधान लाभावे या हेतूने ही सहल आयोजित करण्यात आली होती. 


       या सहलीमध्ये निरा शहरातील सुमारे ४० महिला सहभागी झाल्या. सहलीसाठी निघालेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवथरघळ येथे पोहोचल्यानंतर महिलांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पवित्र स्मृतीस्थळी दर्शन घेतले. त्यानंतर समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या दासबोध या महान ग्रंथातील अध्यायाचे सामूहिक वाचन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात महिलांनी समर्थांच्या विचारांचे चिंतन करत अध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला. 


      यावेळी उपस्थित महिलांनी शिवथरघळ परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला. दर्शनानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेत सहलीचा समारोप केला. 


       या प्रसंगी पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती तथा शिवथरघळ देवस्थान समितीचे अध्यक्ष दत्ता चव्हाण, मुन्ना डांगे, संभाजी डोईफोडे, भारत घोलप, जयश्री वणवे, संगीता शेवाळे, वंदना भोसले आदींसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


      महिला दिनाच्या पुर्वीच आयोजित या सहलीमुळे महिलांना अध्यात्मिक उर्जा मिळाली असून अशा उपक्रमांमुळे समाजात महिलांचा सहभाग आणि उत्साह अधिक वाढतो, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई