राज्यपाल हटवा असा ठराव करणारं गावं कोणतं? गावाने ठरावात काय म्हंटलंय ?
ना शिक : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे. याच दरम्यान नाशिकमधील जाखोरी गावाने राज्यपाल यांना हटवा म्हणून ग्रामसभा बोलावून ठराव केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून ग्रामीण भागातही पडसाद उमटू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला म्हणून नाशिक मधील जाखोरी गावाने बैठक घेऊन राज्यपाल हटवा म्हणून ठराव केला आहे. राज्यपाल हटवा म्हणून असा ठराव करणारे नाशिकच काय राज्यातील पहिले गाव असल्याचं बोललं जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधानावरुन राज्यभर आंदोलन आणि निदर्शने केली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष भगतसिंग कोश्यारी यांच्या मताशी सहमत नसून गडकरी आणि छत्रपती शिवाज...