विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! पोलीस भरतीनंतर राज्यात तलाठी पदांची बंपर भरती
मुंबई , 7 डिसेंबर : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यात 18 हजार पोलीस पदांची भरती होणार आहे. यासाठीचे अर्ज मागवण्यात आले आहे. यानंतर महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात पोलीस पाठोपाठ तलाठी भरतीचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तलाठी भरताची जीआर प्रसिद्ध तलाठी भरती 2022 चा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात तब्बल 3110 तलाठी आणि 511 मंडळ अधिकारी पदांना मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधित जाहिरात ही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे तरूणांसाठी नोकरीची नवी संधी होणार आहे. राज्यभरात 3110 तलाठी तर 511 मंडळ अधिकारी पदे भरली जाणार आहेत. डिसेंबर महिन्यातच नोकरीची जाहिरात निघणार असल्याचीही माहिती आहे. राज्यातील तलाठी भरतीचा हा जीआर महसूल विभागाने काढला. पोलीस भरतीपाठोपाठ आता तलाठी भरतीचाही जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तलाठी होण्याचे तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. गेल्या कित्य...