मित्राच फोन येताच घराबाहेर पडला अन्..., वाढदिवसाच्या दिवशीच बुलडाण्यातील तरुणाचा हृदयद्रावक शेवट

बुलडाणा 13 नोव्हेंबर : बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वाढदिवसाच्या दिवशीच एका इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला आहे. वाढदिवस असल्याने मित्राने फोन करुन या तरुणाला बाहेर बोलावलं होतं . या फोननंतर हा तरुण घराबाहेर पडला , मात्र तो परतलाच नाही. वाढदिवस असल्याने मित्राच्या फोननंतर बाहेर गेलेल्या इंजिनिअर मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यावर मृतक मुलाच्या पित्याने मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाचा खून झाला आहे , असं म्हणत त्यांनी खामगाव पोलिसांत तक्रार दिली आहे तब्बल 24 वर्षांनी उलगडलं एका खुनाचं गूढ...पोलिसांनी हुशारीने शोधून काढला खुनी गौरव जाधव या इंजिनिअर मुलाचा वाढदिवस होता. त्यावेळी त्याला मित्राचा फोन आला आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचं सांगून गौरव घराबाहेर पडला. मात्र , तो परतलाच नाही. नंतर त्याचा अपघात झाला असं सांगण्यात आलं. मात्र हा अपघात नसल्याचं गौरवच्या वडिलांचं म्हणणं आहे. तो अपघात नसून घातपात असल्याचा संशय गौरवच्या वडिलांना आहे. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस सध्या या घटनेचा पु...