पोस्ट्स

मुख्यमंत्री शिंदे यांना भविष्याची चिंता! ! लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुख्यमंत्री शिंदे यांना भविष्याची चिंता! महत्त्वाच्या बैठका रद्द करून साईचरणी धाव, ज्योतिषाला हात दाखवायला मीरगावात ताफा वळवला

इमेज
  स रकारवर सातत्याने होणारे आरोप , मंत्र्यांकडून होणारी वादग्रस्त विधाने , शेतकरी आणि बेरोजगारांची नाराजी यामुळे की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. आज ते आपल्या पूर्वनियोजित बैठका रद्द करून हेलिकॉप्टरने थेट शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पोहोचले. तिथे साईंचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट जवळच्या मीरगावात एका ज्योतिषाकडे पोहोचला. ज्योतिषाला हात दाखवून त्यांनी आपले भविष्य जाणून घेतले. राज्याच्या भवितव्यापेक्षा शिंदे यांना स्वतःच्या भविष्याची जास्त काळजी वाटत असल्याची चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. साईंच्या समाधीसमोर ते नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील , शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हेसुद्धा होते. शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम हा मुंबईत परतण्याचा होता , पण त्यांनी आपला ताफा अचानकपणे नाशिक जिह्यातील सिन्नर तालुक्यातील मीरगावच्या दिशेने रवाना केला. अचानक बदललेल्या या ...