मुख्यमंत्री शिंदे यांना भविष्याची चिंता! महत्त्वाच्या बैठका रद्द करून साईचरणी धाव, ज्योतिषाला हात दाखवायला मीरगावात ताफा वळवला


 रकारवर सातत्याने होणारे आरोप, मंत्र्यांकडून होणारी वादग्रस्त विधाने, शेतकरी आणि बेरोजगारांची नाराजी यामुळे की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.

आज ते आपल्या पूर्वनियोजित बैठका रद्द करून हेलिकॉप्टरने थेट शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पोहोचले. तिथे साईंचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट जवळच्या मीरगावात एका ज्योतिषाकडे पोहोचला. ज्योतिषाला हात दाखवून त्यांनी आपले भविष्य जाणून घेतले. राज्याच्या भवितव्यापेक्षा शिंदे यांना स्वतःच्या भविष्याची जास्त काळजी वाटत असल्याची चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. साईंच्या समाधीसमोर ते नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हेसुद्धा होते. शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम हा मुंबईत परतण्याचा होता, पण त्यांनी आपला ताफा अचानकपणे नाशिक जिह्यातील सिन्नर तालुक्यातील मीरगावच्या दिशेने रवाना केला. अचानक बदललेल्या या दौऱयामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

मीरगाव शिवारात एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. तेथील महादेवाच्या मंदिरात शिंदे यांनी दर्शन घेतले. तिथेच हे ज्योतिषी बसतात. शिंदे यांनी त्यांना आपला आणि पत्नीचाही हात दाखवून भविष्य जाणून घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

चांदीच्या अंगठीत तर्जनीत गोमेद धारण करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उजव्या हाताच्या तर्जनीत चांदीच्या अंगठीत गोमेद रत्न धारण करण्याचा सल्ला मीरगावच्या ज्योतिषी बाबांनी दिल्याची माहिती शिंदे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली. गोमेद हे राहूचे रत्न असून राजकारणातील विरोधकांच्या नजरबंदीसाठी प्रभावी ठरेल असे ज्योतिषाने शिंदे यांना सांगितल्याचेही कळते.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..