Wednesday, October 27, 2021

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवण्याचा शिक्षक महाविकास आघाडीचा निर्धार

 शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवण्याचा शिक्षक महाविकास आघाडीचा निर्धार



  नीरा दि.२७

           पुरंदर तालुक्यातील शिक्षक सहकरी पतसंस्थेची निवडणूक येऊ घातली आहे. या निमित्ताने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पतसंस्थेची निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज अनेकाकदून लावला जात आहे. मात्र ही निवडणूक आपण सहज जिंकून आणि सर्व जागांवर विजय मिळवून असा निर्धार सत्ताधारी महाविकास आघाडीच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे


          पुरंदर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे आर्थिक प्रश्न मिटवले जातात.अनेकांना गरजेच्या वेळी ही पतसंस्था उपयुक्त ठरत असते. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी ही पतसंस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पतसंस्थेचे वर सध्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या शिक्षक महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. या महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात शिक्षक पतसंस्थेची भरभराट झाली आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय या काळात घेतले गेले आहेत. चांगल्या प्रकारचा लाभांश सभासदांना देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर आम्ही शिक्षक सोसायटी मध्ये पुन्हा निवडून येऊ. असा विश्वास शिक्षक महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्यावतीने काल दिनांक २६/१०/२०२१ रोजी नीरा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रात्री आठ ते दहा दरम्यान एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष नाना जोशी यांचेसह शिक्षक संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवली व आगामी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे मतदान घेऊन शिक्षक आघाडीचा पॅनल विजय होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून पत संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडत या पत संस्थेच्या कामाचं कौतुक केले. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारा विना ही पतसंस्था चालवली जात असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळावर विश्वास व्यक्त केला आहे..

Tuesday, October 26, 2021

सासवड येथे अवैध मटका चालवल्या प्रकरणी दोघांवर कारवाई


 सासवड येथे अवैध मटका चालवल्या प्रकरणी दोघांवर    

  कारवाई


    सासवड दि.२७


         पुरंदर तालुक्यातील सासवड येथे अवैधरित्या ऑन लाईन मटका चालवणाऱ्या दोघांविरोधात सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे .या प्रकरणी पोलिसांनी 

सागर राजेंद्र चौखंडे, व अमित राजेद्र म्हेत्रे, यांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

            याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथील बैल बाजार येथील जय गणेश पान टपरीचे समोर सार्वजनिक ठिकाणी,दोन व्यक्ती ऑनलाईन मटका चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सासवड पोलिसांनी 

काल दिनांक २६/१०/२०२१ रोजी ५.३० वा. चे सुमारास सासवड गावचे हद्दीत बैल बाजार समोर असलेल्या जय गणेश पान टपरीचे समोर सार्वजनिक ठिकाणी धाड टाकली असता ,सागर राजेंद्र चौखंडे, वय.२९ वर्ष, रा.नेताजी चौक, सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे. व अमित राजेद्र म्हेत्रे, वय.२८ वर्ष, रा.नेताजी चौक, सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे.हे कल्याण नावाचा मटका जुगार मोबाईलमधील व्हॉटसअप अँप्लीकेशन च्या माध्यमातून चालवत असल्याचे आढळून आले.मोबाईलच्या माध्यमातून ते मध्ये वेगवेगळया ओळखीचे ग्राहकांचे नंबरवरून कल्याण मटक्याचे आकडे देवाणघेवाण करीत होते. त्यांच्याकडे रोख रक्कम व मोबाईल फोन व साहित्य असा एकुण १४.५०० रुपयाचा मुददेमाल मिळून आले आहे. 

           

            या प्रकरणी पोलीस नाईक लियाकतअली युनूस मुजावर यांनी फिर्याद दिली असून या घटनेचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पोटे करीत आहेत.

सासवड येथे निवृत्त शिक्षकाच्या घरातील ७२ हजाराचा ऐवज गेला चोरीला.सासवड पोलिसात तक्रार दाखल.

 सासवड येथे निवृत्त शिक्षकाच्या घरातील ७२ हजाराचा ऐवज गेला चोरीला.सासवड पोलिसात तक्रार दाखल.



   सासवड दि.२६

   पुरंदर तालुक्यातील सासवड येथे चोरीची आणखी एक घटना पुढे आली आहे.याबाबत आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी सासवड येथील निवृत्त शिक्षक जाफर बाबु शेख यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे..या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४५७,३८९ नुसार गुन्हा आज्ञाताच्या विरोधात दाखल केला आहे.



    याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथे त्रिशुल सोसायटी मध्ये राहणारे ७५ वर्षीय सेवा निवृत्त शिक्षक जाफर बाबु शेख यांनी याबाबत तक्रार दिली आहे .दिनांक १३/१०/२०२१ 13/10/2021 रोजी सकाळी १०.३० वाजले पासुन ते दि.२६/१०/२०२१ रोजी सकाळी ८.३० वाजलेच्या दरम्यान त्यांच्या घरात ही चोरीची घटना घडली आहे. या कालावधी मध्ये ते पुरंदर तालुक्यातलं हरगुडे येथे शेतीच्या कामानिमित्त गेले होते , त्यावेळी सासवड गावचे हद्दीतील त्रिशुल सोसायटी प्लॉट नं.६० सर्वे नं.७ मध्ये असणाऱ्या त्यांच्या राहते घरातुन ७२ हजार रुपये किमतीचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. यामध्ये 



३००००/- रू.किमतीची एक तोळ्याची हातातील सोन्याची अंगठी.१००००/- रू.किमतीचा एक चार ग्रँम वजनाचा गळ्यातील सोन्याचा बदाम ९००००/- रू.किमतीची एक तीन ग्रँम वजनाची हातातील सोन्याची अंगठी ५००/- रू.किमतीचे दोन भाराचे चांदीचे पैंजन २२०००/- रू. रोख रक्कम १०००/- रू.किमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल इत्यादींची चोरी झाली आहे. अशा प्रकारची फिर्याद त्यांनी दिली आहे.


     याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक झिंजुर्के करीत आहेत.

Sunday, October 24, 2021

लाचखोर तलाठ्याला कोर्टाचा दणका; एकावर्षाच्या करावसाबरोबर पंधरा हजारच्या दंड ठोठावला.

 लाचखोर तलाठ्याला कोर्टाचा दणका; एकावर्षाच्या करावसा बरोबर पंधरा हजारच्या दंड ठोठावला. 



 बुलढाणा दि.24


      तित्रंव येथे घराची नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेगावच्या एका तलाठ्याला विशेष सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. 



बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तित्रंव येथील चिंतामण पुरुषोत्तम हिंगणे यांनी मार्च २०१६ रोजी एक घर विकत घेतले होते. या घराची नोंद करण्यासाठी शेगाव भाग-२ चे तलाठी सुनील जगन्नाथ ठोंबरे रा. शेगांव यांच्याकडे घर नोंदणीसाठी २३ मे २०१६ रोजी अर्ज केला होता; याव्यवहराची नोंद करण्यासाठी तलाठी सुनील ठोंबरे यांनी चिंतामण हिंगणे यांना तीन हजाराची मागणी केली होती. त्यामुळे चिंतामण हिंगणे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठी सुनील ठोंबरे याला शेगाव येथील त्यांच्या कार्यालयात तीन हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती.


  हे प्रकरणआधिकाचा तपास करून खामगांव येथील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या समोर झाली. याप्रकरणात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी चिंतामण हिंगणे, पंच सचिन देशमुख, तपास अधिकारी मंगेश मोहळ, तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. एन. झाडे या चौघांची साक्ष नोंदविण्यात आली. यांनतर संशयित आरोपी तलाठी सुनील ठोंबरे याने तीन हजाराची लाच घेतल्याचे सिध्द झाले. त्यामुळे सुनील ठोंबरे याला कलम ७ प्रमाणे एक वर्ष शिक्षा व ५ हजार दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा कलम १३ प्रमाणे एक वर्षाची शिक्षा व १० हजार दंड, दंड न भरल्यास २ महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. याा दोन्ही शिक्षा त्याांनी एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.


Saturday, October 23, 2021

जेऊर येथे बेकायदा हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई


 जेऊर येथे बेकायदा हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

  नीरा दि.२४


  पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) नुसार जेऊर येथील शुभम तांबे यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जेऊर गावच्या हद्दीत पश्चिम बाजूला ओढ्यालगत मावलाईचा डोह येथे बाभळीचे झाडाचे आडोशाला हातभट्टीची दारू विक्री करण्यात येत असलेची माहिती पोलिसांना मिळाली होती . या माहितीनुसार जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपी शुभम मोहन तांबे रा. जेऊर ता. पुरंदर जि. पुणे या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला.त्याच्याकडून पोलिसांनी 

७५० /- रू किमतीची एक पांढर्‍या रंगाची पिशवी मध्ये १ लिटर मापाचे १५ पिशव्या म्हणजे १५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली आहे.

याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप मोकाशी करीत आहेत.



नीरा येथे कर्नाटक महामंडळाच्या बसमध्ये प्रवास दरम्यान झाली महिलेची प्रसूती. महिलेने दिला मुलाला जन्म

 नीरा येथे कर्नाटक महामंडळाच्या बसमध्ये प्रवास दरम्यान झाली महिलेची प्रसूती. महिलेने दिला मुलाला जन्म



  नीरा. दि.२४ 

     कर्नाटक येथील देवदुर्ग येथून महाराष्ट्रातील पुणे येथे निघालेल्या महिलेची प्रवास दरम्यान प्रसूती झाली आहे. प्रसूती नंतर ही महिला आणि तिच्या नवजात मुलाला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून ती महिला आणि नवजात मुलाची तब्बेत चांगली असल्याचे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले आहे.

        याबाबत प्रत्यक्षदर्शी सहप्रवाशांनी दिलेली माहिती अशी की,ज्योती सोमनाथ चव्हाण ही २० वर्षीय महिला पुणे येथील भोसरी येथे तिचा पतीसह राहते.ती बाळंतपणासाठी कर्नाटक मधित मानवी तालुक्यातील मुरामपूरतांडा येथे आपल्या वडिलांकडे गेली होती.तेथील डॉक्टरांनी डिलिव्हरी सिजेरियन पद्धतीने करावी लागेल असे सांगितले होते .त्यामूळे तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे आणण्याच्या सल्ला तिच्या पुणे येथे राहणाऱ्या पतीने तिच्या वडिलांना दिला होता.काल रात्री ही बस देवदुर्ग येथून पुण्याकडे रवाना झाली. यामधून ही महिला प्रवास करीत होती.त्यावेळी तिला प्रसव काळा सुरू झाल्या होत्या.



          आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजलेच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या पुढे आल्यावर नीरा जवळ तिला जास्तीचा त्रास होऊ लागल्याने बस मधील इतर महिलांनी पुढाकार घेऊन तिची प्रसूती केली .दरम्यान बस चालकाने १०८ ला फोन करून ॲम्बुलन्स बोलावली. यानंतर या महिलेला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर समीक्षा कांबळे यांनी महिलेवर उपचार केले. त्यांना ज्योती साळवे, योगिता टिळेकर यानी मदत केली.यावेळी कर्नाटक परिवहन चे चालक वाहक व बस मधील प्रवाशांनी सहकार्य करून ही प्रसूती निर्धोकपणे पार पाडण्यास मदत केली. बसमधील सह प्रवाशी लक्ष्मी पवार,नागेश्वरी पवार, रिरेमा राठोड,यांनी ही प्रसूती यशस्वी पणे केली आहे.



गोवा येथे झालेल्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैष्णवी थोपटे प्रथम

 गोवा येथे झालेल्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैष्णवी थोपटे प्रथम



 नीरा . दि.23

पिंपरे (ता. पुरंदर) येथील वैष्णवी पोपट थोपटे हिने गोवा येथे पारपडलेल्या धावण्याच्या स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.वैष्णवी च्या या यशाचं पिंपरे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.वैष्णवी हीची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे.



            अखिल भारतीय खेल महासंघ यांच्यावतीने गोवा येथे धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन आले होते. 

 या मध्ये वेगवेगळ्या गटात व अंतरा मध्ये ही स्पर्धा पार पडली. राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा भरवण्यात आली होती. यामध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पिंपरे खुर्द येथील वैष्णवी पोपट थोपटे हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल पिंपरे खुर्द गावच्या ग्रामस्थांच्या वतीने तिचा आज सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत वैष्णवी थोपटे हिने प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तिला अखिल भारतीय महासंघाच्या वतीने प्रथम क्रमांकाचे मानपत्र व गोल्ड मेडल देण्यात आले त्याच बरोबर तिची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सुद्धा निवड झाली आहे. तिला आंतरराष्ट्रीय धावपट्टू प्रशिक्षक दिपक गावडे यांनी मार्गदर्शन केले. सोमेश्वरचे माजी संचालक विजय थोपटे यांनी वैष्णवी च्या यशा बद्दल तीच कौतुक केले आहे पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे ग्रामीणच्या २१ पोलीस शिपाई पदासाठी २५ ऑक्टोबर रोजी होणार शारीरिक व मैदानी चाचणी

 पुणे ग्रामीणच्या २१ पोलीस शिपाई पदासाठी २५ ऑक्टोबर रोजी होणार शारीरिक व मैदानी चाचणी


पुणे दि. २३

  

     पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यावतीने २१ पोलीस शिपाई रिक्त पदाकरिता दिनांक २१/१० /२०२१ रोजी शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार असून शारीरिक व मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिनांक २४/१०/२०२१ रोजी सकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण चव्हाण नगर,पाषाण रोड येथे उपस्थित राहण्याची सूचना पुणे ग्रामीण अधीक्षक यांच्या कार्यालयामार्फत देण्या आलाय आहे.

    त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मैदानी चाचणी करता उशिरा येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.आवेदन अर्ज भरताना दिलेला फोटो प्रवेश पत्रावर लाऊन प्रवेश पात्र घेऊन यावे. प्रवेश पत्रा शिवाय मैदानी चाचणी करता कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी शासनाने जारी केलेले आधारकार्ड पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, महाविद्यालय ओळखपत्र , ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणते तरी एक मूळ ओळपत्रक सोबत आणावे. अशी सूचना करण्यात आलेली आहे. उमेदवार व तयांच्या सोबत येणाऱ्या लोकांनी covid-19 च्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.मास्क सॅनिटायझर, शारीरिक अंतर इत्यादी गोष्टींचे पालन करावे. भरती प्रक्रियेदरम्यान मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्रतिबंधित वस्तू जवळ बाळगणे प्रतिबंधित आहे .अशा वस्तू उमेदवाराकडे आढळून आल्यास उमेदवार विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असे सांगितले आहे.



दिनांक ३/९/२०२१ रोजी दिलेल्या जाहिरातीत मधील सूचनांची नोंद घ्यावी व त्याचे काटेकोरपणे पालन करावं असं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभासक्रमा बरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षणही द्यायला हवे ; विजय कोलते

 विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभासक्रमा बरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षणही द्यायला हवे ; विजय कोलते 



  नीरा दि. २३


      गावागावात शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ज्ञानाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे शिकलेले कर्तृत्व नेतृत्व घडत आहे. अभ्यासक्रमातील शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी आज जेऊर येथे बोलताना केले. न्यू इंग्लिश स्कूल जेऊर येथील स्थानिक स्कूल कमिटीच्यावतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते. 

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष व स्कूल कमिटीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ होते. यावेळी बोलताना कोलते यांनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे व शिरवळ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या ज्योती तांबे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. गावचे सुपुत्र व स्कूल कमिटीचे सदस्य अनंतराव तांबे व विद्यालयाचे हितचिंतक विश्वासराव जगताप यांची सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विजय कोलते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दत्ता धुमाळ, दिपक साबळे, अनंत तांबे, उत्तम धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      यावेळी गावचे सरपंच स्वाती शिरसाट, उपसरपंच माऊली धुमाळ, मांडकीचे उपसरपंच विश्वासराव जगताप, नारायण तांबे, परशुराम धुमाळ, संभाजी ठोंबरे, तानाजी शिरसाठ, प्रमोद धुमाळ, आप्पा तांबे, लक्ष्मण गडदे, सोपान सांगळे, तेजस जाधव, अनिल भोसले, दादा खोमणे, रवींद्र देशपांडे, ज्ञानेश्वर रसाळ, शांताराम कोलते, विद्यालयाचे मुख्याध्यापक जालिंदर जगताप, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक जेऊरचे माजी सरपंच प्रतीक धुमाळ, सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक सुनील जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत सांगळे यांनी मानले.

Friday, October 22, 2021

परिंचे येथे पैशासाठी विवाहितेचा छळ.सासवड पोलिसात पती व सासू विरोधात तक्रार दाखल

 परिंचे येथे पैशासाठी विवाहितेचा छळ.सासवड पोलिसात पती व सासू विरोधात तक्रार दाखल



सासवड दि.२२ 

            पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील.एका विवाहित महिलेने पती व सासू यांच्याकडून माहेराहून पैसे आणण्यासाठी छळ केल्या प्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  भारतीय दंड विधान कलम 498 (अ),324,323,504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

  

   या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुरंदर तालुक्यातलं  पारिंचे येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने याबाबतची फिर्याद सासवड पोलीस स्टेशन मध्ये  दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीत नुसार सन २०१६ सालापासून  ते  दिनांक २/१०/२०२१0 रोजी रात्री ०९ वाजे पर्यंत तिच्या राहत्या घरी परिंचे  ता. पुरंदर जि. पुणे गावचे हद्दीत हा छळ करण्यात येत होता. तिचा पती प्रकाश शकंर कुचेकर व सासु  पार्वती शंकर कुचेकर  दोघे ही राहणार परिंचे ता.पुरंदर जि.पुणे यांनी फिर्यादीस मोटरसायकल घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आण असे म्हणून तगादा लावला होता. पैसे न दिल्याच्या व सात वर्षे लग्न होवून देखील मूल झाले नाही म्हणून फिर्यादीस तू आमच्या घरी राहावयाचे नाही, तुला आम्हाला नादंवायचे नाही. तू इथे राहू नको तू तुझ्या माहेरी जाऊन रहा. असे बोलून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला. तिचा  पतीने दारू पिवून येवून तू    घरी राहायचे नाही,तू घराचे बाहेर जा, तू येथे राहू नको असे म्हणून लोंखडी सळईने तिचे दोन्ही पायाचे मांडीवर ,उजवे पायाचे पोटरीवर मारहाण करून दुखापत केली आहे.अशा प्रकारची फिर्याद तिने सासवड  पोलिसात दिली आहे.याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार खोमणे करीत आहेत.


दिवे येथे स्वानंदी शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यशाळा सं

 दिवे येथे स्वानंदी शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न



दिवे दि.२२


      पुरंदर तालुक्यातलं दिवे येथे स्वानंदी शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न झाली आहे.

जिल्हा परिषद पुणे यांचेकडून शैक्षणिक गुणवत्ता विकास दहा कलमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत स्वानंदी शिक्षण उपक्रमाची कार्यशाळा आज दिनांक २२ आक्टोबर रोजी दिवे येथे पारपडली.


          पुरंदर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी . मोहन गायकवाड आणि शिक्षण विस्तार अधिकारी पी.एस.मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवे केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख प्रतापराव मेमाणे यांच्या नेतृत्वात स्वानंदी शिक्षण कार्यशाळा शुक्रवारी दिवे येथे पार पडली. स्वानंदी शिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांना तणाव विरहित व आनंदी शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास चांगल्या पद्धतीने होईल.


   या उपक्रमाची चार खंडांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सजगता खंड , गोष्ट खंड, कृती खंड व अभिव्यक्ती खंड अशी ही विभागणी करण्यात आली आहे. हे सर्व खंड आठवडाभरच्या शैक्षणिक नियोजनात ३५मिनिटांच्या तासिकेत घेतले जाणार आहेत. या

उपक्रमामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया तणावरहित, प्रभावी व आनंदी होणार आहे.

 

यावेळी समन्वयक म्हणून उदय पोमण व राजेंद्र गाढवे यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे ही कार्यशाळा आनंदी वातावरणात पार पडली 

राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्यावतीने ग्रामीण. भागातील एस्टी सेवा सुरू करण्याची मागणी

 राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्यावतीने ग्रामीण. भागातील एस्टी सेवा सुरू करण्याची मागणी


.


 सासवड दि.२२


      कोरोना संकटातून समाज जीवन आता सुरळीत होत आहे.शाळा महाविद्यालये सुधा सुरू झाली आहेत. पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची एस.टी. बंद असल्यामुळे प्रवासाची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्वी प्रमाणे तालुक्यातील एस.टी.बस गाड्या सुरू कराव्यात यासाठी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतीने सासवडच्या आगार प्रमुख इनामके यांना निवेदन देण्यात आले.


       यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष पुष्कराज जाधव, सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुकाध्यक्ष संदेश पवार, पुरंदर तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष किरण गदादे, कामगार सेलचे अध्यक्ष विक्रम फाळके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सासवड शहराध्यक्ष अतुल जगताप, राष्ट्रवादी युवकचे सुमित लवांडे, अभी दुर्गाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुक्याचे सचिव सौरभ टेकवडे, पराग जाधव व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जेजुरी येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने कर्ज मेळाव्याचे आयोजन


 जेजुरी येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने कर्ज मेळाव्याचे आयोजन


 जेजुरी दि.२२


    पुरंदर तालुक्यातलं जेजुरी शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच जेजुरीतील मंदिर गेल्या दोन वर्षापासून बंद असल्या कारणाने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गेली दोन वर्ष सर्व व्यवसाय ठप्प आहेत. या अनुषंगाने तसेच प्रत्येकाला बँकेत जाऊन कर्ज मिळण्याची माहिती व्यवस्थित मिळत नाही. तसेच कर्जाची पूर्तता करणे व माहिती घेणे शक्य नसते. म्हणून भारतीय जनता पार्टी जेजुरी शहरच्यावतीने कर्ज मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका तसेच प्रायव्हेट बँका, सहकारी बँका यांनी भाग घेतला, 


         एसबीआयचे बँक अधिकारी यांच्याशी बोलून तसेच काही अन्य बँकाशी चर्चा करून ५० हजारापासून ते ५० लाखापर्यंत कर्ज देण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज यांची कागदपत्रे, केवायसी, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, उद्योग आधार, शॉप ॲक्ट लायसन, बँक स्टेटमेंट, सिबिल रिपोर्ट यांची माहिती घेऊन जे ग्राहक योग्य वाटले त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात आला. यावेळी जयराम देशपांडे' शहराध्यक्ष सचिन पेशवे कार्याध्यक्ष गणेश भोसले विजयाताई भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Thursday, October 21, 2021

पुरंदर तहसील कार्यालया मधील चंदन चोरी नंतर आता सासवड न्यायालयातील चंदनाचे झाड चोरीला गेल्याचे आले पुढे

 पुरंदर तहसील कार्यालया मधील चंदन चोरी नंतर आता सासवड न्यायालयातील चंदनाचे झाड चोरीला गेल्याचे आले पुढे



 सासवड दि..२१ 

              पुरंदर तालुक्यात सध्या चोरांनी पोलिसांना चागलेच नकी नऊ आणल्याचे दिसते आहे.लोकांच्या घरात चोऱ्या करणे असो की, सोसायटीच्या पार्किंग मधील गाडी चोरी करणे असो. आता अशी कामे चोर सहज करू लागले आहेत.या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणा कुठे तरी कमी पडताना दिसते आहे.आणि म्हणूनच ज्या न्यायालयाच्या दरात सर्व सामान्य लोक न्याय मागायला जातात त्याच न्यायालयाच्या दरात बिंदास्तपणे चोरी होऊ लागली आहे.आता लोकांना न्याय देणारे न्यायालय सुद्धा सुरक्षित राहिले नाही. हेच यातून स्पष्ट होत आहे.कारण सासवडच्या न्यायालयाच्या आवारातून चक्क चंदनाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.



                काल तहसील कार्यालया मधुन चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर सासवड पोलिसात याबाबत तक्रार सुद्धा देण्यात आली होती. त्याचबरोबर अशाच प्रकारची तक्रार आता सासवड न्यायालयातून सासवड पोलिसांमध्ये देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, सासवड न्यायालयात काम करणाऱ्या संगीता राजेंद्र तागडे यांनी यांनी सासवड न्यायालयाच्या आवारातील चंदनाचे झाड चोरीस गेल्याची तक्रार सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १४/१०/२०२१ रोजी सायंकाळी ६ वा. ते दिनांक २०/१०/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजालेच्या दरम्यान सासवड दिवाणी न्यायालय येथून २२०० रुपये किमतीचे एक चंदनाचे झाड, अंदाजे १४

ते १७ फूट उंचीच्या चंदनाच्या झाडाचा ४० सेंटिमीटर रुंदीचा बुंधा ७ फूट उंची असलेले लाकूड कोणीतरी अज्ञाताने चोरून नेले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हिप्परकर करत आहेत



वाल्हे येथे मसनेर देवाची यात्रा झाली उत्साहात संपन्न

 वाल्हे येथे मसनेर देवाची यात्रा झाली उत्साहात संपन्न


 वाल्हे दि.२१

    पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे मसनेर देवाची यात्रा उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या यात्रेची आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी सांगता करण्यात आली. कोरोनामुळे गेली दोन वर्षे सलग ही यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र घटस्थापनेच्या वेळेस शासनाने मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आज ही यात्रा उत्साहात संपन्न झाली.


      वाल्हे येथे असलेल्या मदनेवस्ती येथील व कामठवाडी येथील मसनेर मंदिरात मध्ये काल रात्री रात्रभर छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी देवाची विधिवत पुजाआर्चना करण्यात आली व लगर तोडण्याचा कार्यक्रम ही घेण्यात आला. सायंकाळी पुन्हा ढोल, ताशा, सनईच्या तालावर गुलालाची मुक्त उधळण करीत, 'मसनेर देवाचे चागंभले' नावाचा गजर करीत भाविकांनी यात्रेचा आंनद लुटला.



       यावेळी दादासो मदने, पोपट मदने, भाऊसो मदने, लक्ष्मीण मदने, ज्ञानेस्वर मदने, शिवा मदने, भिवा मदने, सागर मदने, संतोष मदने, धनंजय मदने, यासह समाजातील सर्व भाविक भक्तांनी यात्रेच आंनद घेतला.

 प्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, बारामती लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष अजिंक्य टेकवडे, ओबीसी सेलचे अशोक बरकडे, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संदेश पवार, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, हनुमंत पवार, अभी दुर्गाडे यांच्यासह अनेक मान्यवरांसह, ग्रामस्थांनी मसनेर देवाचे दर्शन घेतले.





पुरंदर तालुका सरपंच संघटनेची कार्यकारणी जाहीर

 पुरंदर तालुका सरपंच संघटनेची कार्यकारणी जाहीर

सासवड दि.२१

               पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा अधिकारी कर्मचारी यांच्याकडून सहकार्य होत नसल्याने पुरंदर तालुक्यातील सर्व सरपंचांनी मिळून सरपंच संघटना स्थापन केली असून, याची नवनियुक्त कार्यकारणी आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी हि दिवे येथे जाहीर करण्यात आली.

    आज झालेल्या या बैठकी मध्ये नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच हरिदास खेसे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी, काळदरी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेशकाका जगताप यांची संघटनेचे प्रवक्ते व कार्याध्यक्षपदी, महादेव चंद्रकांत बोरावके यांची उपाध्यक्षपदी, रामदास जगताप, उद्धव भगत, अमोल खवले, ऋतुजा जाधव, यांची निवड कार्यकारिणी मध्ये करण्यात आली. तर महिला अध्यक्षपदी सीमा भुजबळ, भूषण ताकवले यांची सचिव पदी , बाबासो लोळे यांची सहसचिव पदी , चंद्रकांत बोरकर यांची खजिनदार तर संजय कटके यांची सह खजिंदरपदी निवड करण्यात आली आहे, सोमनाथ कणसे यांनी या कार्यकारिणीच्या निवडीचे निमंत्रण दिले होते.



         संघटनेचे सदस्य म्हणून कविता वाघोले, हेमलता कटके, राजश्री थोरात, अश्विनी खळतकर, सोनाली चाचर, मारुती भाडळे, तेजस्वी काकडे, पुनम झेंडे, दशरथ जानकारी, प्रियंका शिंदे, बाळासो कोलते,उषा पवार,भाऊसो कापरे, धनंजय यादव, दत्तात्रय पवार, श्वेता चव्हाण, रुपाली जगताप, प्रमोद जगताप, प्रियंका शिंदे, स्वाती शिरसाट, बाबासाहेब खेंगरे, नवनाथ वाघले, सागर करवंदे, रेवती कुंजीर यांची निवड करण्यात आली असल्याचे अध्यक्ष हरिदास खेसे यांनी सांगितले.



सासवड मध्ये हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

 सासवड मध्ये हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

 सासवड दि.२१



    पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या सासवड येथील जेजूरी नाका येथील समद ऑटोमोबाईल्सच्या शेजारी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर उपविभागीय कार्यालय व सासवड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी सागर जयसिंग माने रा. इंदीरानगर सासवड,ता.पुरंदर,जि.पुणे याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

     याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात उपविभागीय कार्यालयात पोलीस नाईक सोमेश भगवंतराव राउत यानी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे .त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजलेच्या सुमारास जेजुरी नाक्यावरील समद ऑटोमोबाईल्सच्या शेजारी हातभट्टीची दारू विक्री करण्यात येत होती. सागर जयसिंग माने रा. इंदीरानगर हा त्याच्या ताब्यातील गावठी हातभटटीची तयार दारू विक्री करीत होता.पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून त्याला पकडे असता त्याच्याकडे 1400 रुपये किमतीची हातभट्टीची दारू आढळून आली.पोलिसांनी त्याच्या विरोधात मुंबई प्रोबिशण अँक्ट. 65(ख) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.



 याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कांतोडे करीत आहेत.



Wednesday, October 20, 2021

ऊस वाहतूक बंद ठेवण्यासाठी आपल्याच वाहनांचे नुकसान करू नका. सोमेश्वरचे माजी संचालक व वाहतूकदार विजय थोपटे यांचे आवाहन

ऊस वाहतूक बंद ठेवण्यासाठी आपल्याच वाहनांचे नुकसान करू नका. सोमेश्वरचे माजी संचालक व वाहतूकदार विजय थोपटे यांचे आवाहन 



  नीरा दि.२०


   डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मेटाकुटीला आलेल्या ऊस वाहतूक संघटनेने साखर कारखान्यांकडून ऊस वाहतूक दर वाढवून मिळावा याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूकदार संघटनांनी ऊस वाहतुक बंद केली आहे. या संपामध्ये वाहतूकदारांच्या वाहनांचे नुकसान करू नका असे आवाहन विजय थोपटे यांनी केले.


    बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव, भवानीनगर कारखान्याच्या ऊस तोडणीला सूरवात झाली आहे .मात्र वाढत्या झिजेलाच्या किमती मुळे ऊस वाहतूकदरांनी वाहतूक दर वाढवून देण्याची मागणी केली आहे.मात्र कारखाना प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने वाहतूकदारांकडून बंद पुकारण्यात आला आहे.हा बंद यशस्वी व्हावा म्हणून संघटनेचे कार्यकर्ते वाहनांचे टायर पंचर करीत आहेत. किंवा हवा सोडून देत आहेत.मात्र यामुळे आपल्याच वाहनांचे नुकसान होत असून हा संप शांततेच्या मार्गाने करण्याचं आवाहन सोमेश्वरचे माजी संचालक व वाहतूक व्यवसायिक विजय थोपटे यांनी आज नीरा येथे माध्यमांशी बोलताना केले आहे. ही वाहने आपलीच आहेत आणि आपल्याच वाहनांचे नुकसान करू नका. अगोदरच वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे वाहतूकदार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्याला आणखी त्रास देऊ नका. आपल्याच वाहनांचे नुकसान करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.त्याच बरोबर कारखाना प्रशासनाने देखील वाहतूकदार संघटनांच्या मागणीचा विचार करावा.आणि हा प्रश्न तातडीने सोडवावा असे आवाहन कारखाना प्रशासनाला केले आहे.



सासवड येथे मोटर सायकलची चोरी

 सासवड येथे मोटर सायकलची चोरी


सासावड पोलिसात तक्रार दाखल


 सासवड दि.20


  पुरंदर तालुक्यातील सासवड येथील विश्व लक्ष्मी हाईट मध्ये पार्क केलेली मोटारसायकल रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे.याबाबत सासवड पोलिसात तक्रार देण्यात आली असून,पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


   याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथील उत्तम ढाब्याच्या माठीमागे असलेल्या विश्व लक्ष्मी हाईट मध्ये राहणाऱ्या शशांक शिरीष नवले यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या सोसायटी मध्ये दिनांक १८/१०/२०२१ रोजी रात्री ८ ते दिनांक १९/१०/२०२१ रोजी सकाळी ८वाजलेच्यां दरम्यान त्यांची कळ्या रगांची व टाकीवर पाढंरे रगांचे पट्टे असलेली स्पेंडर मोटर सायकल क्रमांक एम एच १२ आर व्ही.४८७३ ही कोणीतरी अज्ञाताने चोरून नेली आहे. त्यांच्या सोसायाईच्या पार्किंग मध्ये असलेली सुमारे 30 हजार रुपये किमतीची ही मोटर सायकल चोरीला गेली आहे.

या बाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नांगरे करीत आहेत.




पुरंदर तहसील कार्यालयात चंदनाची चोरी हाकेच्या अंतरावर पोलिस कस्टडी असतानाही झाली चोरी

 पुरंदर तहसील कार्यालयात चंदनाची चोरी

हाकेच्या अंतरावर पोलिस कस्टडी असतानाही झाली चोरी.


   सासवड दि.२०



    पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कचेरीतील चंदनाच्या झाडाची कोणीतरी अज्ञाताने चोरी केलीय.तहसील कार्यालयाच्या आत आणि पोलीस कस्टडी अगदीच जवळ असताना ही चोरी झाल्याने आता पोलीस प्रशासना समोर चोरांच मोठे आव्हान निर्माण झाले आहे.तालुक्यात सासवड वाल्हे या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असतानाच आता चोरांची मजल थेट तहसील कार्यालयातील चंदन चोरी पर्यंत गेली आहे.

प्रशासनाच्या ताब्यातील वस्तू सुरक्षित रहात नसतील किंवा अश्या ठिकाणी बेधडकपणे चोरी करण्याची हिम्मत चोर दाखवत असतील तर .तालुक्यातलं कायदा सुव्यवस्था किती लयास गेली आहे हेच यातून स्पष्ट होतंय असा सूर आता लोकांनामधून निघायला लागला आहे.


      संपूर्ण तालुक्याचे महत्त्वाचे कार्यालय हे तहसील कार्यालय असते. याच कार्यालयातून संपूर्ण तालुक्याचा गाडा हाकला जातो पण आता कार्यालयातील झाडे झुडपे सुद्धा आता सुरक्षित राहिली नाहीत. पुरंदरच्या तहसील कार्यालया पाठीमागील बाजूला सेतू सेवा केंद्र ची इमारत आहे. या इमारतीमधील मुख्य लाकडाच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे झाड तोडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चक्क पुरंदरच्या तहसील कार्यालयातच चंदनाची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



      चंदन चोरांनी तर पुरंदर तहसील कार्यालयाच्या आवारातील चंदन चोरून आपली चतुराई दाखवली आहे. आता पोलीस चंदन चोरांचा शोध घेणार का? पोलीस आपली चतुराई दाखवणार का याचीच चर्चा सध्या परिसरामध्ये आहे. या संदर्भात आवधुत गोविंद खैरे यांनी आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सासवड पोलिसात तक्रार दिली असून याबाबतचं अधिकचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुजावर करीत आहेत.



आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषी जयंती निमित्ताने हजारो कोळी बांधवासहित वाल्हेकरांनी घेतले वाल्मिकी समाधीचे दर्शन.

 आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषी जयंती निमित्ताने हजारो कोळी बांधवासहित वाल्हेकरांनी घेतले वाल्मिकी समाधीचे दर्शन.



वाल्हे (दि.२०) 


पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींची जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आज हजारो कोळी बांधव व वाल्हेकर नागरिकांनी वाल्मीक ऋषींचे दर्शन घेतले.


          मागील तेरा वर्षांपासून,महाराष्ट्र कोळी समाज संघ व वाल्हेकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने राज्यातील कोळी बांधव मोठ्या संख्येने येऊन, या ठिकाणी मेळावा घेतात. व आपल्या मागण्या शासन दरबारी मांडतात.मात्र, कोळी समाजाचे नेते, महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचे माजी अध्यक्ष, अनंत तरे यांचे निधन झाल्यामुळे, यवर्षी मेळावा रद्द करुन समाधी स्थळी विधिवत पुजा - अर्चा करुन हभप चेतन महाराज शिंदे यांचे फुलाचे कीर्तन करण्यात आले. व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.



        यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रथम स्वर्गीय अनंत तरे यांना सर्वांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. व नुतन अध्यक्षपदी निवड झालेले अनंत तरे यांचे सुपुत्र, जयेश तरे यांना समाजाची पुढची दिशा देण्याचे काम त्यांच्या हाती सोपवण्यात आले.यावेळी जयेश तरे म्हणाले समाजाचे प्रश्न व वाल्मिकी मंदीर विकास करण्यासाठी स्थानिकांना बरोबर घेऊन, विकास करु.

         तसेच कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी अनंत तारे यांच्या आठवणी सांगत याठिकाणच्या स्थानिकांना व कोळी बांधवांना बरोबर घेऊन, लवकर ट्रस्टची स्थापना करुन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप व माजी आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून, यातिर्थ क्षेत्राचा विकास करण्याचे अश्वासन दिले.

       यावेळी, महाराष्ट्र राज्य कोळी समाज संघाचे उपाध्यक्ष अरविंद चिव्हे, वाल्मिकी जयंती उत्सव समिती प्रमुख शामराव अधटराव, सचिव मदन भोई , प्रल्हाद कदम, पोपट बेसके, मल्लू शेठ कोळी, संजय रोकडे, राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव, हभप माणिक महाराज, हभप अशोक महाराज पवार, संदेश पवार, प्रकाश कड, हनुमंत पवार, किरण गदादे, राजेंद्र रोकडे, अभि दुर्गाडे आदिसह अनेक कोळी बांधव उपस्थित होते.



Tuesday, October 19, 2021

सासवड येथे वकिलाच्या घरात चोरी; चोरट्यांनी अडीच लाखाचा मुद्देमाल केला लंपास


 सासवड येथे वकिलाच्या घरात चोरी; चोरट्यांनी अडीच लाखाचा मुद्देमाल केला लंपास

 

सासवड दि.19


 पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका विधी तज्ञाच्या घरामध्ये चोरांनी हात मारले घरामध्ये चोरा चोरी करून सुमारे २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची तक्रार सासवड पोलिसात देण्यात आली आहे.याबाबत सासवड पोलिसांनी आड दिनांक १९ ऑक्टोबर रोजी भारतीय दंड विधान कलम ४५७,३८०,५११ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला


 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सासवड येथील उत्तम धाब्याच्या पाठीमागे असलेल्या कमल कॅस्टल सोसायटी मध्ये राहणाऱ्या शुभांगी दत्तात्रेय गाडीलकर या विधीततज्ञाने याबाबतची तक्रार सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १६/१०/२०२१ रोजी दुपारी २ ते दिनांक १९/१०/२०२१ रोजी सकाळी ८ वाजलेच्या सुमारास ही घटना घडली आहे. कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीलकर यांच्या फ्लॅटमधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली यामध्ये १४००००/- रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसुत्र, ४००००/- किमतीचे एक तोळयाचे कानातले ,१२०००/- रुपये किमतीचे तीन ग्रॅमची हातातील अंगठी ५०००००/- रुपये रोख रक्कम त्यामध्ये ५०० रू दराच्या १०० नोटा असा २४२००० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची तक्रार देण्यात आली आहे.

    या बाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणकर करीत आहे.

गुळूंचे येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे चोरीची घटना टळली

 गुळूंचे येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे चोरीची घटना टळली 

पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेवर संदेश दिल्याने  ग्रामस्थ झाले सावध

  पुरंदर दि.१९

 


              पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोर आल्या संदर्भात सूचना दिल्याने लोक सावध आल्याने चोरीची घटना टळली आहे. याबाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनच्यावतीने देण्यात आली आहे.

               याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील गुळूंचे ते आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी पहाटे  २ वाजता  ८ ते ९ जन चोरीच्या उद्देशाने कोयता,कुराड,काठी असे शस्त्र हातामध्ये घेऊन गुळूंचे येथे आले होते.गावातील अक्षय पाटोळे यांना ते दिसले असता चोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून शांत राहायला सांगितले. पाटोळे यांनी याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील  दीपक जाधव यांना कळवली आणि पोलीस पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व पोलीस स्टेशनला या बाबतचा संदेश दिला व जेजुरी पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी सावध झाले.त्याच बरोबर जेजुरी पोलिस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आणि संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच,चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.

         अपदकालिन काळात लोकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या संदेश यंत्रणेचा वापर करण्याचं आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी लोकांना केले आहे.

वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे नीरा येथील दूध व्यावसायिकाला ३००० लिटर दूध द्यावे लागले ओतून

 वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे  नीरा येथील दूध व्यावसायिकाला ३००० लिटर दूध द्यावे लागले ओतून



 नीरा दि. १९

  

पुरंदर तालुक्यातील नीरा येथील दूध संकलन करणाऱ्या व्यावसायिकाला वीज वितरणाच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. वीज वितरणाचे कोणत्याही प्रकारची सूचना न देता वीज कनेक्शन तोडल्याने त्याच्याकडे असलेले तीन हजार लिटर दूध वाया गेले आहे. हे सर्व दूध आज कोजा गिरी  पौर्णिमेच्या मुहूर्तावर अक्षरशः गटारात ओतून द्यावे द्यावे लागले आहे.



             यासंदर्भात दूध संकलनाचा व्यवसाय करणारे विराज जगताप म्हणाले की, त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर वीज वितरणने त्यांना लॉकडाऊनचे कारण दाखवत कोणत्याही प्रकारचे बिल दिले नव्हते. मात्र त्यानंतर त्यांना आलेले बिल त्यांनी टप्या टप्याने भरले होते. आता त्यांच्याकडे वीज वितरणाची वीस हजार रुपये बाकी होती.जगताप ते बिल भरण्यासाठी तयार होते. मात्र तरीदेखील वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आज दिनांक १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्लांटची वीज कट केली. आणि यामुळे त्यांचं तीन हजार लिटर दूध वाया गेले आहे. जगताप यांनी वीज वितरणच्या गलथान कारभाराचा निषेध केला . त्याच बरोबर याबाबत ग्राहक न्यायालयाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असे त्यांनी म्हटलंय.



     

Monday, October 18, 2021

शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्या निमित्ताने नीरा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

 माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्या निमित्ताने नीरा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

    


नीरा दि.१८


   पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज राष्ट्रवा जीदी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खटपे यांच्यावतीने आज नीरा येथील रयत संकुलात तसेच गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना एक हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.



        माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा राष्ट्रवादीच्यावतीने आयोजीत करण्यात आला आहे. या निमित्त आज नीरा येथील सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळा,महात्मा गांधी विद्यालय व गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूल मध्ये शालेय विद्यार्थ्यांना एक हजार वह्यांचे वाटप पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा कोमलताई निगडे, निरा शहर अध्यक्षा तनुजा शहा, निरा शहर ओ.बी.सी. सेल अध्यक्ष सुनिल पाटोळे यांच्या हस्ते हे वह्या वाटप करण्यात आले. 



        यावेळी निरा येथील सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा बोडरे, पर्येवेक्षक लोहकरे, सह शिक्षिका रुपाली रणनवरे, सपना ओव्हाळ, शितल शिंदे उपस्थित होत्या. महात्मा गांधी विद्यालय निरा येथे पर्यवेक्षक जे.एन. दाभाडे, सह शिक्षक बी.बी. धायगुडे, एस. बी. पवार, एस. एन. कुंभार, के.डी. वाघ, कर्मचारी जे.एन. गायकवाड उपस्थित होते. ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळुंचे येथे मुख्याध्यापक एन.व्ही. ओव्हाळ, बी.आर. राऊत, एस. डी. कदम उपस्थित होते. 



स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी 'तुषार काकडे' यांची निवड


 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी 'तुषार काकडे' यांची निवड 

- जेजुरी दि.१८

पुरंदर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी कोथळे येथील तुषार काकडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी खासदार,संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

           शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेले विविध संघटनात्मक कार्याची व सामाजिक कार्याची दखल घेत जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश भोईटे यांनी केलेल्या शिफारसीनुसार काकडे यांची पुरंदर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

         


  राजू शेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक युवक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत आपल्या घामाचे दाम मिळवायला शिकले आहेत.अनेक युवक संघटनेत सामील होत आहेत , येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करायचे काम करू असे यावेळी तुषार काकडे यांनी सांगितले. 

             तुषार काकडे यांच्या निवडीबद्दल जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाशभाई भोईटे, शेतकरी नेते सतीश काकडे,बाजार समितीचे संचालक धनंजय भोईटे, शहाजी जगताप, राहुल भोसले, वंदना जगताप तसेच समस्त ग्रामस्थ कोथळे व समस्त शेतकरी वर्गाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...