विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभासक्रमा बरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षणही द्यायला हवे ; विजय कोलते
नीरा दि. २३
गावागावात शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ज्ञानाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे शिकलेले कर्तृत्व नेतृत्व घडत आहे. अभ्यासक्रमातील शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी आज जेऊर येथे बोलताना केले. न्यू इंग्लिश स्कूल जेऊर येथील स्थानिक स्कूल कमिटीच्यावतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष व स्कूल कमिटीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ होते. यावेळी बोलताना कोलते यांनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे व शिरवळ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या ज्योती तांबे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. गावचे सुपुत्र व स्कूल कमिटीचे सदस्य अनंतराव तांबे व विद्यालयाचे हितचिंतक विश्वासराव जगताप यांची सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विजय कोलते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दत्ता धुमाळ, दिपक साबळे, अनंत तांबे, उत्तम धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावचे सरपंच स्वाती शिरसाट, उपसरपंच माऊली धुमाळ, मांडकीचे उपसरपंच विश्वासराव जगताप, नारायण तांबे, परशुराम धुमाळ, संभाजी ठोंबरे, तानाजी शिरसाठ, प्रमोद धुमाळ, आप्पा तांबे, लक्ष्मण गडदे, सोपान सांगळे, तेजस जाधव, अनिल भोसले, दादा खोमणे, रवींद्र देशपांडे, ज्ञानेश्वर रसाळ, शांताराम कोलते, विद्यालयाचे मुख्याध्यापक जालिंदर जगताप, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक जेऊरचे माजी सरपंच प्रतीक धुमाळ, सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक सुनील जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत सांगळे यांनी मानले.