डिजिटल मिडीयातील पत्रकारांना अधिस्विकृती देणे सुरु : मराठी पत्रकार परिषदेकडून या उपक्रमाचे स्वागत

डिजिटल मिडीयातील पत्रकारांना अधिस्विकृती देणे सुरु : मराठी पत्रकार परिषदेकडून या उपक्रमाचे स्वागत मुंबई- केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यायला सुरूवात केली आहे.. मनी कंट्रोल डॉट कॉम या युट्यूब चॅनलच्या सहसंपादक सुमी दत्ता याच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. ही डिजीटल मिडीयातील पत्रकारांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याबाबत पीआयबीने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी एक नियमावली तयार केली.. त्या नियमावलीचा आधार घेत सुमी दत्ता यांनी अधिस्वीकृतीसाठी अर्ज केला होता.. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सुमी दत्ता यांचा अर्ज मंजूर केला गेला.. आता त्यांना अधिस्वीकृती मिळाली आहे.. महाराष्ट्रात देखील डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यासाठी नियमावली तयार करावी आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती...