कुंभारवळण येथे एकाचा खून : सासवड पोलिसात मयताच्या भावाने दिली फिर्याद

 कुंभारवळण येथे एकाचा खून : सासवड पोलिसात मयताच्या भावाने दिली फिर्याद 



सासवड दि.२३

   


       पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ कुंभारवळण येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अशोक साधू जगताप याचा मृत्यू झाला आहे.


 याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील कुंभारवळ येथील वीट भट्टीवर ही घटना घडली आहे.या ठिकाणी एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सासवड येथे राहणारे व मयत व्यक्तीचा भाऊ असलेल्या सतीश साधू जगताप यांनी दिली आहे. या प्रकरणी त्यांनी निलेश गायकवाड या व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.निलेश याने त्यांच्या भावाला दगड विटा व काठीच्या साह्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत सासवड पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई