विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांची झाडाझडती ! सर्वच कार्यालयांतील दप्तर तपासणीचे आदेश
पु णे - राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कारभाराला चाप बसावा , यासाठी विशेष तपासणी पथकांद्वारे कार्यालयांच्या तपासणीचा धडाका लावण्यात आला आहे . तपासणीनंतर पथकांनी तत्काळ वस्तुनिष्ठ अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे “ भानगडी ’ आढळणाऱ्या कार्यालयातील अधिकारी , कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागणार आहे. पुणे , मुंबई , नागपूर , अमरावती , औरंगाबाद , लातूर , कोल्हापूर , नाशिक या आठ ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालये आहेत. यातील बहुंसख्य कार्यालयातील कामकाजाबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेत मांढरे यांनी या सर्वच कार्यालयांतील दप्तर तपासणीचे आदेश बजाविले. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिकारी , अधीक्षक , लेखाधिकारी यांचा समावेश असलेली स्वतंत्र तपासणी पथके नियुक्त केली. शिक्षण उपसंचालक डॉ.श्रीराम पानझाडे यांच्याकडे पुणे , औरंगाबाद , हारुन आत्तार यांच्याकडे कोल्हापूर , अमरावती , देवीदास कुलाल यांच्याकडे मुंबई , डॉ.वंदना वाहुळ यांच्याकडे नाशिक ...