आता उपग्रह करणार तुमच्या जमिनीचे राखण, शेजाऱ्याने शेत खाल्ले की सांगणार!
पु णे : तुमचा शेताचा बांध कुणी कोरलाय का ? सातबारा उताऱ्यानुसार ती शाबूत आणि जागेवर आहे का ? दुसऱ्याची शेती विकत घेताना दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात जमीन पूर्ण ताब्यात आली आहे का , अशा प्रश्नांना आता नेमके उत्तर मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने यावर तोडगा काढला असून , सातबारा उताऱ्याला उपग्रहाद्वारे काढलेल्या नकाशाची जोडणी करून जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. राज्यातील बारामती आणि खुलताबाद या दोन तालुक्यांतील प्रत्येकी दहा गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन वर्षांमध्ये हा उपक्रम राज्यभरात पू्र्ण करण्याचा मानस आहे. एखाद्या शेतकऱ्याची जमीन सातबारा उताऱ्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर कमी आहे. त्याच्याकडून सातबारा उताऱ्यानुसार जमीन महसूल गोळा केला जात असेल तर त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. जमीन खरेदीच्या व्यवहारांतही पैशांचा पूर्ण मोबदला अर्थात पूर्ण जमीन ताब्यात आली का याची पडताळणी आवश्यक असते. यावर भूमी अभिलेख व जमाबंदी आयुक्तालयाने अनोखा उपक्रम राबविण्यास सुुरुवात केली आहे. मोजणीत होणार मदत , अतिक्रमणे रोखता येणार - - या नकाशांवरून एका शेतकऱ्याच्या हद्दीवरून ...