पोस्ट्स

बजेट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोठी बातमी! नव्या बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये होणार बदल?

इमेज
  सर्वसामान्य लोकांना आधीच   महागाईनं   मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये   RBI  ने व्याजदर वाढवल्याने रेपो रेट महाग झाले. त्यामुळे लोन आणि कर्ज महाग झालं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. CNBC आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार   टॅक्स स्लॅबमध्ये   बदल केला जाण्याची शक्यता आहे. नवा टॅक्स स्लॅब सर्वसामान्य लोकांचा विचार करून तयार केला जात आहे. सध्या याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. काही नव्या सुविधा ग्राहकांना मिळणार असल्याचं समजत आहे. सरकार आता याबाबत विचार करत असून लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले जाऊ शकतात. जुन्या टॅक्स व्यवस्थेत बदल करून आता 5 लाखांपर्यंत ही मर्यादा वाढवली जाऊ शकते. 2.5 लाख रुपयांपर्यंत ज्याचं उत्पन्न होतं त्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. आता मात्र ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येऊ शकतो. होम लोनच्या व्याजदरात मिळू शकते सूट   सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार सरकार ग...