पोस्ट्स

राज्यसरकार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन

इमेज
  पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन  पुणे दि.१४   राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागणी संदर्भात येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक 13 जून रोजी पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे याबाबतची माहिती पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिली       राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात पोलीस पाटलांनी आंदोलन केलं होतं. यावेळी सरकारने या मागण्यांवर लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन दिले होते. मात्र यानंतरही पोलीस पाटलांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथी गृहावर दिनांक 13 जून रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन राज्यातील पोलीस पाटलांना मानधन व...

पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती

इमेज
पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त   पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती मुंबई: पोलीस भरतीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी १ नोव्हेंबरपासून भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली   आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. आज (दि.२९) स्थगिती देण्यात आली आहे .भरती बाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासकीय कारणामुळे पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. गेली ३ वर्ष पोलीस भरती झाली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी अपात्र ठरणार होते. भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरतील तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आह...

वेदांता प्रकल्पावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज ?

इमेज
 वेदांता प्रकल्पावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज ? मुंबई दि.२०   वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने आता सत्ताधारी एकनाथ शिंदे गटातही नाराजीचा सूर फिरून येवू लागला आहे.हा प्रकल्प महाराष्ट्र रहावा अशी मागणी या गटातून होत आहे.                   राज्यात सध्या वेदांत प्रकल्पावरून विरोधकांनी रान उठवले आहे.त्यामुळे शिंदे सरकारची प्रतिमा खराब झाली आहे.राज्यात लोकांकडून नाराजीचा सुर येताना दिसतो आहे.त्यातच आता शिदे समर्थक आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे. वेदांता प्रकल्प हातातून निसटल्यानंतर शिंदेगटात नाराजीचा सूर आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्य सरकारची नाचक्की झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांची आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस पावलं उचलावीत, असा आमदारांचा सूर आहे. उद्योग मंत्री उदय सामंत दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील रस्ते आणि वेदांता प्रकल्पावर चर्चा होणार असल्याची माहीती आहे.

सत्तांतरानंतर आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांना होणार सुरवात

इमेज
  ·          सत्तांतरानंतर आता अधिकाऱ्यांच्या   बदल्यांना होणार सुरवात ·          मुंबई : १३ ·          राज्यात सत्तांतर होताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात मंगळवारी झाली. सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी हे एप्रिल २०१५ पासून पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत होते. गतवर्षी ते एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी विदेशात गेले होते. तिथून परतल्यानंतर आता त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. आपल्या कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांमधील आयएएस अधिकाऱ्यांचा एक कोअर गट स्थापन केला होता. त्यात परदेशी यांचा समावेश होता. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो ; मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक...