वेदांता प्रकल्पावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज ?

 वेदांता प्रकल्पावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज ?



मुंबई दि.२०



  वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने आता सत्ताधारी एकनाथ शिंदे गटातही नाराजीचा सूर फिरून येवू लागला आहे.हा प्रकल्प महाराष्ट्र रहावा अशी मागणी या गटातून होत आहे.

        

         राज्यात सध्या वेदांत प्रकल्पावरून विरोधकांनी रान उठवले आहे.त्यामुळे शिंदे सरकारची प्रतिमा खराब झाली आहे.राज्यात लोकांकडून नाराजीचा सुर येताना दिसतो आहे.त्यातच आता शिदे समर्थक आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे. वेदांता प्रकल्प हातातून निसटल्यानंतर शिंदेगटात नाराजीचा सूर आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्य सरकारची नाचक्की झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांची आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस पावलं उचलावीत, असा आमदारांचा सूर आहे. उद्योग मंत्री उदय सामंत दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील रस्ते आणि वेदांता प्रकल्पावर चर्चा होणार असल्याची माहीती आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.