Wednesday, January 12, 2022

सौ .लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 सौ .लिलावती रिखवलाल  शहा कन्या शाळेत  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

नीरा ; 


दिनांक २१ जानेवारी

    पुरंदर तालुक्यातील सौ लीलावती रिखवलाल  शहा कन्या शाळेत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवा पिढीला मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

        आज दिनांक १२ जानेवारी रोजी विद्यालयाच्या प्राचार्य निवेदिता पासलकर व पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांच्या हस्ते  स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवा पिढीला मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .स्वराज्याची उभारणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सांस्कृतिक आणि धाडसी जडणघडण करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांचे कार्य अतुलनीय आहे.त्यांच्या कार्याचा आदर्श सर्व समाजाने ठेवावा असे प्रतिपादन यावेळी प्राचार्य निवेदिता पासलकर यांनी केले.स्वामी विवेकानंदांनी युवा पिढीला मार्गदर्शक तत्वे देऊन राजयोग, कर्मयोग, आणि भक्ती योगाची शिकवण दिली,त्या मार्गाने जाऊन देशहित साधावे  असे प्रतिपादन पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले.या वेळी संजय भोसले,अमर नांदखिले,ज्ञानेश्वर जाधव,शीतल शिंदे,सविता मदने , सुप्रिया लाटकर व सर्व सेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured Post

जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार

 जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार  पुरंदर :        नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडर...