सौ. लिलावती रिखवलाल शहा विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनीनी मिळवले  शिष्यवृत्ती परीक्षेत यश 


  

 नीरा दि. ११

      पुरंदर तालुक्यातील नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनीनी  शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून शिष्यवृत्ती मिळवली आहे.विध्यालायाच्या मुख्याध्यापिका  निवेदिता पासलकर यानी याबाबतची माहिती आज  दिनांक १1 जानेवारी रोजी माध्यमांना दिली आहे.

              उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत २०२१ – २००२२ या शैक्षणिक वर्षात कन्या शाळेच्या इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातून स्वरांजली संदीप येळे हिने  १८४ गुणमिळवून    जाई संतोष डोईफोडे १४४ गुण मिळवून   गुणवत्ता यादीत निवड निश्चित केली आहे.त्याच बरोबर  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी ईश्वरी दिनेश मनमोडे हिने १७० गुणमिळवल्याने ती  विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे . शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवल्या बद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  निवेदिता पासलकर व पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्याना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षे करिता या विद्यार्थ्यांनीना  संतोष शिंदे , अमरसिंह नांदखिले, अश्विनी खोपे, रूपाली रणनवरे, अनिता दाभाडे, सविता मदने या शिक्षकांनी मार्गदर्शन केले .तर इयत्ता ५ वि शिष्यवृत्तीसाठी संजय भोसले, अनिता दाभाडे ,शीतल शिंदे,सविता मदने , अश्विनी खोपे यांनी मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.