निरा येथे घरफोडी; १२.६२ लाखांचा ऐवज लंपास पोलीसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लावली.

निरा येथे घरफोडी; १२.६२ लाखांचा ऐवज लंपास

पोलीसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लावली. 



निरा (ता. पुरंदर) : 

       पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पालखी तळाच्या परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १२ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास यंत्रणा तत्काळ कामाला लागली असुन वेगात तपास सुरू केला आहे. 


     जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 39/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305, 331(4), 331(5) अन्वये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद निरेतील प्रसिद्धी व्यावसायिक उत्तम किसनराव आगवणे (वय ६९ वर्षे) यांनी दिली आहे. आगवणे यांचे मोरगाव येथे पेट्रोल पंप, निरा बस स्थानकासमोर चप्पल दुकान व राधाकृष्ण मंगल कार्यालय असे व्यवसाय आहेत. ते 'कृष्णकूंज' नगर सातारा रोड निरा वॉर्ड नं. ६, ता. पुरंदर येथील स्वमालकीच्या इमारतीत राहतात. 


     पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी आगवणे घरात नसताना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा कापून अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम चोरून नेली.

चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील डिझेल-पेट्रोल विक्रीची ५,३७,७६० रुपयांची रोख रक्कम तसेच कार्यालय व चप्पल दुकानातील १,५०,००० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. याशिवाय सुमारे ७.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (अंदाजे किंमत ३,२५,००० रुपये), २ तोळ्याचे सोन्याचे नेकलेस (१,००,००० रुपये), अर्धा तोळ्याची सोन्याची चैन (२५,००० रुपये), तीन सोन्याच्या अंगठ्या (५०,००० रुपये) तसेच सहा जोड सोन्याचे टॉप्स (७५,००० रुपये) असा एकूण १२,६२,७६० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. 


     घटनेची नोंद शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३३ वाजता करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत. 


     पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे. शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर पुणे गुन्हा अन्वेषण विभागाने या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. 


    या घरफोडीमुळे निरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू