मेंढपाळ पालकांचा मुलगा बनला एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट; संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी

मेंढपाळ पालकांचा मुलगा बनला एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट; 


संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी 



पुरंदर : 

       प्रत्येक यशामागे संघर्षाची एक कहाणी दडलेली असते. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री यांवर मात करत एका मेंढपाळ कुटुंबातील मुलाने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. अर्जुन बिरा महानवर याची भारतीय स्टेट बँकेत (SBI) ज्युनिअर असोसिएट (JA) पदावर निवड झाली आणि मेंढपाळांच्या झिरिपवस्तीत आनंद साजरा झाला. 


    पुरंदर तालुक्याच्या गुळूंचे कर्नलवाडी येथील झिरिपवस्तीतील अर्जुनचे आई-वडील पारंपरिक पद्धतीने मेंढ्या राखून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ग्रामीण आणि साध्या वातावरणात वाढलेल्या अर्जुनने लहानपणापासूनच शिक्षणाला प्राधान्य दिले. घरची परिस्थिती मर्यादित असतानाही त्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले. अनेक अडचणी, अभाव आणि संघर्ष असूनही त्याने हार मानली नाही. 


   अर्जुनचे प्राथमिक शिक्षण पुरंदर तालुक्यातील झिरिपवस्तीच्या पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये झाले. महर्षी वाल्मिक कनिष्ठ महाविद्यालयात ११-१२ चे वाणिज्य विभागातून शिक्षण घेतले. तर, महाविद्यालयीन शिक्षण सासवडच्या वाघेरी महाविद्यालयात येथे झाल्यानंतर पुण्यात बँक क्षेत्रातील परिक्षा देत होते. गेली अडीच तीन वर्ष सातत्याने प्रयत्न करत राहिले व आज शुक्रवार दि.२७ फेब्रुवारी रोजी एसबीआय मध्ये ज्युनिअर असोसिएट पदी निवड जाहीर झालेल्याने मेंढपाळ वस्तीत आनंदोत्सवात नाहली. 



       अर्जुन अभ्यास करत असताना त्याचे पालक मेंढ्या चारत होते. अर्जुनही शालेय जिवनात मेंढ्या संभाळत. कुटुंबाच्या कष्टातून आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर अर्जुनने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखेर एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट पद मिळवून आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले. 


त्याच्या यशाने एक महत्त्वाचा संदेश दिला आह. यश ठरवणारी गोष्ट म्हणजे तुमची पार्श्वभूमी नव्हे, तर तुमची मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांवरचा विश्वास. अर्जुनची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 


अर्जुन बीरा महानवर याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू