पोलीस पाटलांच्या मागण्यांवर लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ : गिरीश महाजन यांचे आश्वासन
पुणे दि.१४
राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागणी संदर्भात येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक 13 जून रोजी पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे याबाबतची माहिती पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिली
राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात पोलीस पाटलांनी आंदोलन केलं होतं. यावेळी सरकारने या मागण्यांवर लवकरच निर्णय घेऊ असा आश्वासन दिले होते. मात्र यानंतरही पोलीस पाटलांच्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथी गृहावर दिनांक 13 जून रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन राज्यातील पोलीस पाटलांना मानधन वाढ आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये पोलीस पाटलांचा विषय मार्गी लावला जाईल याबाबत ठोस आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे. पोलीस पाटलांच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आ.मंगेश चव्हाणयांनी पुढाकार घेतला.
मागील 22 डिसेंबरच्या मोर्चामध्ये त्यांनी राज्यातील पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सविस्तर असे मार्गदर्शन केले होते आणि त्यांनी पाठपुरावा सुद्धा चालू केला होता. यावेळी राज्याचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील श्री कमलाकर मांगले पाटील, राज्य सचिव श्री निळकंठ थोरात पाटील, खजिनदार जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री नरेंद्र शिंदे पाटील, दीपक चौधरी पाटील, किशोर भदाने पाटील, तालुकाध्यक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू काका राक्षे पाटील,श्री गुलाब मि॓ढे, राज्य सरचिटणीस श्री विजय कुंजीर पाटील, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाजीराव पवार पाटील, दिनेश पाटील ,रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश घेणे पाटील,जिल्हा संघटक रायगड नांदेड जिल्हा अध्यक्ष भास्कर कंकाळ पाटील, प्रवीण गोसावी पाटील, खानदेश विभाग अध्यक्ष जीवन पाटील, चाळीसगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, हेमराज पाटील कार्याध्यक्ष जळगाव, रावसाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, विजय पाटील तसेच राज्यातील अनेक पोलीस पाटील आजच्या बैठकीला हजर होते. गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांचा पाठपुरावा राज्यातील पोलीस पाटील भक्कम साथ आहे. लवकरच पोलीस पाटलांच्या पदरी मानधन वाढीच्या आनंदाची बातमी मिळेल अशी माहिती वाघापूर चे पोलीस पाटील आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस विजय कुंजीर यांनी दिली आहे.