Type Here to Get Search Results !

सासवड आणि जेजुरी येथे "महासेवा दिनाचे" आयोजन लोकांच्या तक्रारीचे करण्यात येणार निवारण

 सासवड आणि जेजुरी येथे "महासेवा दिनाचे" आयोजन

  लोकांच्या तक्रारीचे करण्यात येणार निवारण



पुरंदर दि.२०


  पुरंदर तालुक्यातील सासावड आणि जेजुरी नगर परिषदेच्या हद्दीत दिनांक 21 सप्टेंबर रोजी " महासेवा दिनाचे" आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी प्रशद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

          राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व विभागांकडील प्रलंबित संदर्भ अर्ज/ तक्रारी यांचा निपटारा करण्या बाबत आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण पुणे जिल्हयात एकाच वेळी म्हणजेच दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी "महासेवा दिन " आयोजित करणेत आला आहे. त्याचा नागरिक, विद्यार्थी, लाभार्थी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन या कार्यक्रमाचे नियंत्रण व समन्वय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी महसूल मंडळ भागातील गावांकरिता व सासवड आणि जेजुरी नगरपालिकेकरिता महासेवा दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सासवड येथील नगर परिषद कार्यालय व जेजुरी येथील सांस्कृतिक भवन येथे सकाळी १०.३० वाजले पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

     या कार्यक्रमामध्ये महसुल, नगरविकास, आरोग्य, कृषी विभाग व इतर सर्व विभागांच्या योजनांचा लाभ व तक्रारीचा निपटारा होणार आहे.त्याच बरोबर योजनांचा तात्काळ लाभ देण्यात येईल व नविन अर्ज स्विकारले जातील.

 यामध्ये प्रामुख्याने

    संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना यांचे अर्ज स्विकारले जातील. प्रकरणीकामी तलाठी यांचेकडील आवश्यक दाखले तात्काळ वितरीत केले जातील.


हक्कनोंदणी :- एकंदर कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, अज्ञान पालन करणार नोंद कमी करणे, बँक बोजा कमी करणे

बाबतचे अर्ज स्विकारले जातील.

आधारकार्ड आधारकार्डमधील दुरुस्ती नविन आधारकार्ड काढून देणे.

   शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढविणे, नावात दुरूस्ती करणे, दुबार शिधापत्रिका देणे याबाबत तात्काळ कार्यवाही करणेत येईल.

 ज्या खातेदारांची पी. एम. किसान ekye अद्याप पूर्ण झालेली कागदपत्रे दाखल केल्यास तात्काळ ekyc करून देण्यात येईल.

 मतदान कार्डला आधारकार्ड Link करणे.

 जातीचे दाखले, नॉनक्रिमिलिअर, उत्पन्न, रहिवास व इतर दाखले देणे, वितरित करणे व नविन अर्ज स्विकारले जातील

कृषी विषयक सेवांबाबत माहिती देण्यात येईल.

त्याच बरोबर मोफत आरोग्य तपासणी व मार्फत औषोधोपचार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.


नगरपालिका विभागा मार्फत नविन नळ जोडणी, अर्ज स्विकारणे, कर आकारणी प्रमाणपत्र देणे, जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देणे, बांधकाम परवानगी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे,


महावितरण विभागा मार्फत 

नविन विज जोडणीबाबतचे अर्ज स्विकारले जातील.असे  

महसूल विभागा मार्फत सांगण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies