वाल्हे येथे वीज पडल्याने कडब्याची गंज पेटली.
यामध्ये ७०० कडबा जळून झाला खाक.
वाल्हे दि.२२
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजिक असलेल्या सुकलवाडी येथे आज सायंकाळी वीज पडल्याने जनावराच्या चारा असलेल्या कडब्याच्या गांजिने पेट घेतला. या मध्ये शेतकऱ्याच मोठ नुकसान झालं आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी सुकलवाडी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष नारायण पवार व माजी उपसरपंच धनंजय पवार यांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक 22 एप्रिल रोजी
सायंकाळी वादळवारे सुरू झाले होते. सायंकाळी सात वाजता राजेंद्र जयसिंग पवार यांच्या कडब्याच्या गांजीवर वीज पडली. यामध्ये त्यांचे अंदाजे २१ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.त्याच बरोबर त्यांच्या लगतचे शेतकरी दत्तात्रय मारुती पवार यांची शेतातील पिकाच्या संरक्षणासाठी लावलेली नेट व लाकडी खांब जाळून गेले आहे. यामध्ये त्यांचे १० ते १२ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे...
सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.....