शेतातील अतिक्रमण व महिलेचा विनयभंग प्रकरणी कोर्टाचे पोलिसांना तपासाचे आदेश

 शेतातील अतिक्रमण व महिलेचा विनयभंग प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर सासवड पोलिसात फिर्याद दाखल



  सासवड दि.२१ 


     पुरंदर तालुक्यातलं सासवड पोलीस स्टेशन मध्ये कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणापोटी व महिलेचा विनय भंग केल्या प्रकरणी सासवाड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी भा.द.वी.कलम 354,323,452,427,504,506(2),120(ब) व 34. नुसार गुन्हा दाखल केला आहे.

    या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गराडे येथील मठवस्ती येथील 64 वर्षीय सौ.मालन चद्रकांत जगदाळे  या महिलेने  याबाबत फिर्याद दिली आहे.तिने याबाबत कोर्टामध्ये खाजगी तक्रार केली होती. कोर्टाने पडताळणी करून संबधित आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसा आरोपी सुजित सुरेश जगदाळे ,सुमित सुरेश जगदाळे, समीर मुरलीधर जगदाळे,मल्हारी तुळोबा जगदाळे ,आनंता मलबा जगदाळे ,नवनाथ लक्ष्मण जगदाळे,गणेश बाळासाहेब जगदाळे व इतर इसम यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. या आरोपींनी दिनांक 08/02/2022 रोजी संगणमत करून बेकायदेशिर रित्या फिर्यादी यांचे जागेत प्रवेश करून फिर्यादी यांचा विऩयभंग करून फिर्यादी व त्यांच्या कुटूबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद देण्यात आली आहे. 

    या आरोपींनी दिनांक  10/07/2021 रोजी आरोपी यांच्या विरूध्द जमिनीचा वादातून धमकी ,मनगट शाही व विहीरीच्या कनेक्शन चे नुकसान केल्याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल केली होती .परंतू आरोपी यांचे राजकिय वलय असल्यामुऴे पोलीसांनी आरोपी विरूध्द कुठलीही कायदेशिर कार्वाही केली नाही. त्यामुळे आरोपी यांना कुठलेही कायदा व सुव्यवस्थेच भय राहिले नसल्यामुळे

फिर्यादी यांनी दिनांक 10/02/2022 रोजी सासवड पोलीस स्टेशन येथे स्वतः तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी कुठलीही तक्रार / फिर्यादी नोदंवून घेतली नाही. फिर्यादी यांनी वेळोवेळी सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज देवून सुध्दा पोलीस खात्याने आरोपी विरूध्द कोणतीही कारवाई केली नाही . सदर गुन्हा हा दखलपात्र व गभींर स्वरूपाचा असताना सुध्दा पोलीसांनी दखल घेतली नाही म्हणून त्यांनी कोर्टा समोर  फिर्याद मदाखल करणे भाग पडले. असे कोर्टात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


   त्यामूळे कोर्टाने  आरोपी यांनी बेकायदेशिररित्या जमाव करून आनाधिकृत पणे फिर्यादी यांचे जागेत प्रवेश करून फिर्यादी यांचे अंगावर धावून येवून साडीचा पदर ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्राकारचे वाईट वर्तन करून फिर्यादी व त्यांचे कुटूबियांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामूळे कोर्टाने त्यांची तक्रार ग्राह्य धरून या तक्रारीच्या आधारे फोजदारी प्रक्रीया सहिंता 156(3) नुसार तपास करण्याचे आदेश दिल्यावरून  सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?