राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर
१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान
मुंबई :
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जालना, पुणे, सोलापूर, परभणी, कोल्हापूर, बीड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली व धाराशिव या १२ जिल्ह्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणाला पुन्हा एकदा वेग येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. अर्ज छाननीनंतर २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील विकासाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा राजकीय व्यासपीठ मिळणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.
या निवडणुकांकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, ग्रामीण सत्तासमीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

No comments:
Post a Comment