Friday, September 16, 2022

जाणून घ्या वीर धरणातून सकाळी सहा वाजले पासून किती होतोय पाण्याचा विसर्ग

 नीरा नदी काठच्या लोकांसाठी आता दिलासा दायक बातमी आहे .नीरा नदीतून सोडण्यात येनाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट



पुरंदर दि.१७


        काल म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी नीरा नदिणपत्रार पात्रात वीर धरणातून ४३७३४ क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत होते .त्यामुळे नीरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.नीरा नदीवरील काही पुल पाण्या खाली गेले होते.त्यामुळे सासवड वीर लोणंद हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.


       दरम्यान आज शनिवारी सकाळी सहा वाजल्या पासून वीर धरणातून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी घट करण्यात आली आहे..त्यामुळे आता नीरा नदीची पूर स्थिती कमी होणार आहे .त्यामुळे नीरा नदी काठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी वीर धरणातून ४३८३३ क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं होत.ते कमी करून आज सकाळी सहा वाजले पासून १५९११ क्युसेक करण्यात आलंय त्यामुळे नीरा नदी आता धोक्याचा पातळी पेक्षा कमी वाहते आहे . नदीकाठच्या लोकांना आता दिलासा मिळाला आहे. त्याच बरोबर सासवड वीर लोणंद मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. याबाबतची माहिती पाठबांधरे विभागाकडून देण्यात आली आहे.





No comments:

Post a Comment

Featured Post

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे  नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा  नीरा :   ...