Type Here to Get Search Results !

पिंपरे येथे सहा कारचा विचित्र अपघात

 पिंपरे येथे सहा कारचा विचित्र अपघात

  पुढच्या ने ब्रेक दाबल्याने पाठीमागील कार आदळल्या एकमेकावर नीरा दि.१०


    पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथे आज शनिवारी पुणे पंढरपूर मार्गावर विचित्र अपघात झालाय . नीरा डाव्या

कालव्या शेजारी सोमेश्वर टायर दुकानापुढे एका चारचाकी गाडीने जाग्यावरच ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या पाच ते सहा गाड्या एकमेकांवर येऊन आदळल्या

  यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी या वाहनांचे मोठे नुकसान झालय.


     सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणेच्या दिशेने आलेल्या व पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सहा चारचाकी गाड्या एका पाठोपाठ एकमेकांवर आदल्याने गाड्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालय. कोणकोणाला धडकले आहे. कोणालाच समजले नसल्याने त्या ठिकाणी दोन तासापेक्षा अधिक काळ भांडणे सुरू होती .त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.. दरम्यान स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन ही भांडणे मिटवली व वाहतूक सुरू करण्यात आली. याबाबतची माहिती पिंपरे येथील राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते अभय थोपटे यांनी दिली.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies