प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी जेऊर येथील विजय तांबे यांची नियुक्ती

 प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी जेऊर येथील विजय तांबे यांची नियुक्ती





नीरा दि.२३

पूरंदर तालुक्यातील जेऊर येथे राहणारे आणि दिव्यांग व्यक्तींना नेहमीच मदत करणारे विजय तांबे यांची प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

        शिरूर येथे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव व महिला अध्यक्ष अनिता कदम यांनी नियुक्तीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या हस्ते तांबे यांना दिले आहे.विजय तांबे यांनी यापूर्वी पुरंदर तालुका अध्यक्षपद भूषविले आहे. संघटनेने  मुबंई. दिल्ली गुजरात .पुणे सह इतर सर्व ठिकाणी केलेल्या आंदोलनात  ते कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते  संघटन मध्ये त्यांचे चांगले काम आहे.त्याच्या १० वर्षाच्या कार्याची दखल घेऊन  त्यांना पुणे जिल्हा सचिव पद देण्यात आले आहे.याबाबत बोलताना तांबे म्हणाले की,'संघटनेने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी चांगल्या प्रकारे पारपडील .प्रत्येक अपंग व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील '

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

धक्कादायक नीरा लोणंद रोडवर तडिपार गुंडांकडून ६ पिस्टल, मोकळ्या मॅग्झीन, ३० जिवंत काडतूसासह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.

भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका