नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.
नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू
चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.
पुरंदर :
पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे गावचे हद्दीत माळवाडी जवळील उड्डानपुलाच्या उतारावर चारचाकी व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन एक जण ठार झाले आहेत. दुचाकीस्वार अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद (वय ७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. गणेष बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे (ता. कोरेगाव जि. सातारा) यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिरोज अल्लाउदीन सय्यद (वय ४७ वर्षे) रा. शिवतक्रारवाडी नीरा यांनी जेजुरी पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. ७ जुलै) दुपारी सव्वा चार वाजता सुमा टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. ११ सी. क्यु २८५७ वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे ता. कोरेगाव जि. सातारा याने त्याचे ताब्यातील वाहन जेजुरी बाजुकडुन नीरा बाजुकडे घेवुन जात असताना ते हयगयीने निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवुन, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून चालवून, त्याचे समोर जेजुरी बाजुकडुन नीरा बाजुकडे जाणारे दुचाकी क्र. एम. एच. ११ ए.जे ९३७६ वरील अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद (वय ७५ वर्षे) रा. शिवतक्रारवाडी नीरा वार्ड नं ५ (ता. पुरंदर जि. पुणे) यांचे दुचाकीस पाठीमागुन ठोस देवुन अपघात करून अपघातामध्ये अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद याचे डोकीस व शरीरावर झालेल्या जखमास व मृत्युस व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत. म्हणुन सय्यद यांनी टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच.११ सी. क्यु २८५७ वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकबे ता. कोरेगाव जि. सातारा याचेविरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सर्जेराव पुजारी हे करीत आहेत.
Comments
Post a Comment