पुरंदर तालुक्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १३ हजार ५०० रुपयांच्या तपासण्या मोफत; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
पुरंदर तालुक्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
१३ हजार ५०० रुपयांच्या तपासण्या मोफत; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
पुरंदर :
भाजपा पुरंदर तालुका पूर्व मंडलाच्या वतीने शनिवार, ३० मे २०२६ रोजी नीरा शिवतक्रार येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्याचे महामंत्री राजेशजी पांडे यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तब्बल १३ हजार ५०० रुपयांच्या आरोग्य तपासण्यांचा लाभ नागरिकांना विनामूल्य मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या शिबिरामध्ये रक्तातील सर्व घटक तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी यासह डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मोतीबिंदू व काचबिंदू संदर्भातील तपासणीसुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. तसेच दातांची तपासणी, दातांमध्ये सिमेंट भरणे, दातांची सफाई आणि पॉलिश यांसारख्या सुविधा देखील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
हे शिबिर नीरा शिवतक्रार, ता. पुरंदर, जि. पुणे येथील वॉर्ड क्रमांक १, पीएमटी स्टॉप, पोलीस स्टेशन शेजारी आयोजित करण्यात आले आहे. माता-भगिनी, महिला, पुरुष तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा पुरंदर तालुका पूर्वचे अध्यक्ष संजय काका निगडे, सरचिटणीस उमेश (भाऊ) चव्हाण आणि डॉ. संदीप नवले यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा