वीर धरणात एक जण बुडाला :

 वीर धरणात एक जण बुडाला 



 वीर 


गणपती विर्सजनास वीर धरणात गेलेल्या लोणंद एमआयडीसी मधील तरूण कामगार बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. लोणंदच्या एका कंपनीतील कामगार गणपती विर्सजन करण्यासाठी वीर धरणामध्ये गेला असता, गणपती विर्सजन करताना पाण्यात बुडाल्याची घटना घडली. 


वीर धरणात गणपती विर्सजन करताना बुडालेल्या कामगाराचे


नाव संताराम गौर असे असून तो उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येतेय

 बुडालेल्या कामगाराचा शिरवळ पोलिसांनी शोध मोहिम सुरू

केली असून, त्याच्या शोधासाठी पाचगणी येथील रेस्क्यू टीम

पाचारण केली आहे. वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुडालेला तरुण सापडण्यास अडचण निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शोधमोहिम सुरू असून बुडालेल्या या तरुणाचे नातेवाईक काठावरच बसून आहेत.




Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..